Home > News > पंकजा मुंडे यांचा भाजपला घरचा आहेर...

पंकजा मुंडे यांचा भाजपला घरचा आहेर...

तुमच्या नाका-तोंडात पाणी जात असताना तुम्ही एखाद्या झाडाची फांदी पकडली तर तुम्ही ती फांदी पकडू नका, असं आपण म्हणू शकत नाही...

पंकजा मुंडे यांचा भाजपला घरचा आहेर...
X

भाजपमध्ये आपल्याला सातत्याने डावललं जात असल्याची भावना व्यक्त करीत एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकला. त्यावरून पंकजा मुंडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

एकनाथ खडसे यांनी दसरा मेळाव्यात आपण वेगळा विचार करत असून पंकजा मुंडे यांनीही वेगळा विचार करावा, असं वक्तव्य केले होते. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र पंकजा मुंडे या भाजपमध्येच राहिल्या. तसेच 2019 मधील पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर त्यांचं पुनर्वसन केलं जाईल, अशी शक्यता होती. मात्र राज्यसभा निवडणूक, केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तार, विधानपरिषद निवडणूकीत दोन वेळा पंकजा मुंडे यांना डावलण्यात आलं. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. त्यापार्श्वभुमीवर पंकजा मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपला घरचा आहेर दिला आहे.

एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय चुकला का? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, कुणाचा निर्णय चुकला की बरोबर आहे? हे सांगण्याएवढी मी परिपक्व नाही. मात्र परिस्थिती एखादा निर्णय घेण्यास भाग पाडत असते. तुमच्या नाका-तोंडात पाणी जात असताना तुम्ही एखाद्या झाडाची फांदी पकडली तर तुम्ही ती फांदी पकडू नका, असं आपण म्हणू शकत नाही, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं.

पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना परिस्थिती निर्णय घेण्यास भाग पाडत असते. तसेच नाका-तोंडात पाणी जात असताना फांदी पकडू नका, असं आपण म्हणू शकत नाही असं म्हटले आहे. मात्र खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपले खच्चीकरण होत असल्याचा आरोप केला होता. त्यापार्श्वभुमीवर तुमच्या नाकातोंडात पाणी जात असताना तुम्ही एखाद्या झाडाची फांदी पकडली तर फांदी पकडू नका, असं आपण म्हणू शकत नाही. याचा अर्थ भाजपमध्ये खडसे यांच्यावर अन्याय होत होत असल्याचा अप्रत्यक्ष टोला पंकजा मुंडे यांनी लगावला असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला असल्याचे म्हटले जात आहे.

Updated : 3 Sep 2022 3:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top