Home > News > "मिलेट मिशन" मध्ये खंबाळे, पालघर आश्रम शाळेतील विद्यार्थिनींचा सहभाग

"मिलेट मिशन" मध्ये खंबाळे, पालघर आश्रम शाळेतील विद्यार्थिनींचा सहभाग

मिलेट मिशन मध्ये खंबाळे, पालघर आश्रम शाळेतील विद्यार्थिनींचा सहभाग
X

24 फेब्रुवारी 2023 रोजी सर विठ्ठलदास ठाकरसे कॉलेज ऑफ होम सायन्सने "मिशन मिलेट्स: मेनस्ट्रीमिंग मिलेट फॉर अ स्मार्ट, सस्टेनेबल टुमॉरो" या विषयावर एक मेगा इव्हेंट आयोजित केला होता . २०२३ "मिलेट्स आंतरराष्ट्रीय वर्ष" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या काळात आपल्या सर्वांना मिलेट्सचे महत्त्व आणि अस्तित्व पुन्हा एकदा कळले पाहिजे. मिलेट्स पुनरुज्जीवित करणे हे या संस्थेच्या प्रत्येक व्यक्तीसाठी निश्चित केलेले ब्रीदवाक्य आहे

मेगा इव्हेंटचे उद्दिष्ट आणि फोकस यांचे पालन करून, विविध इव्हेंट्स आणि उपक्रमांची योजना करण्यात येत असते . त्या प्रत्येकामागे विचार केला गेला की प्रत्येकाच्या मनात मिलेट हे आपले भविष्य आहे आणि आजचे पोषण निवडण्यासाठी योग्य पर्याय आहे . 24 फेब्रुवारी रोजी एसव्हीटी कॉलेज ऑफ होम सायन्स (स्वायत्त) चे प्राचार्य डॉ. जगमीत यांनी विद्यार्थ्यांच्या तरुण मनावर त्यांचे ज्ञान आणि कौशल्य प्रदान करण्यासाठी विविध मान्यवरांना आमंत्रित केले होते .

लेफ्टनंट कर्नल उपदेश कुमार, संयुक्त सल्लागार, नीती आयोग, भारत सरकार यांना वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. तसेच 'फूड प्रोसेसिंग अँड ऍग्रीकल्चर प्रॅक्टिसेसमधील मिलेट्स नवोन्मेष' या विषयावर उद्घाटनपर भाषेण डॉ. दयाकर राव, प्रधान शास्त्रज्ञ, ICAR - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स रिसर्च, आणि सीईओ, न्यूट्रीहब यांनी केले आहे .तसेच या सत्राला भारताचे मिलेट मॅन, पद्मश्री डॉ खादर वल्ली फूड अँड न्यूट्रिशन एक्सपर्ट, उपस्थित होते. त्याच्या कौशल्य, ज्ञान आणि पद्धतींनी लाखो लोकांच्या जीवनाला स्पर्श केला आहे आणि या सत्रात त्यांनी सर्वांची मने सुद्धा जिंकली आहेत .

या मेगा मिलेट इव्हेंटच्या संदर्भात एसव्हीटी कॉलेज ऑफ होम सायन्सच्या एनएसएस प्रोग्राम ऑफिसर सुलक्षणा माने यांच्या मार्गदर्शनाखाली, पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळा, खंबाळे येथील विदयार्थ्यांची मिशन मिलेट्स या थीमवर 'पोस्टर स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये मुले आणि मुलांचा चंगळ प्रतिसाद मिळाला आहे . येथील २५ विद्यार्थी आणि दोन शिक्षकांना २४ तारखेला मेगा मिलेट कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले. कारण ही शाळा SVT, कॉलेज ऑफ होम सायन्स , राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे दत्तक घेतली आहे. या कार्यक्रमात अंजू तुलशियान NSS सह अध्यक्षा आणि NSS स्वयंसेवकांनी आश्रम शाळेतील मुलांना मदत करून त्यांना मुंबई सारख्या शहरात मेगा मिलेट कार्यक्रमात आणून कार्यक्रमाची शोभा विद्यार्थिनींना स्पर्धेमध्ये बक्षिसे दिली आहेत . कु. पवित्रा हडळे, कु. कृतीका वधान आणि कु. प्रतिक्षा चधरी या विद्यार्थिनी बक्षीस विजेत्या होत्या. हा पुरस्कार AFSTI ने प्रायोजित केले आहेत . संस्थेने त्यांच्या योगदानाबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आहे .

Updated : 1 March 2023 11:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top