Home > News > आयांनो लेकराला फटाके देताना जरा जपून, होऊ शकते कारवाई

आयांनो लेकराला फटाके देताना जरा जपून, होऊ शकते कारवाई

आयांनो लेकराला फटाके देताना जरा जपून, होऊ शकते कारवाई
X

राजस्थान, ओडीसा, सिक्कीम या राज्यानंतर महाराष्ट्रातही दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे या बंदीबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी असा टोपे यांचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने ते मंत्रीमंडळ बैठकीत ही मागणी करणार आहेत. दिवाळीत राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाला बाधा येऊ शकते. कोरोनात श्वसनाला त्रास होतो. त्यामुळे ]यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी अशी आरोग्य विभागाची भूमिका आहे.

दिवाळीच्या 5 मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने गृह विभागाने जारी केल्या आहेत.

1) दिवाळीत प्रदूषण होऊ नये ही बाब विचारात घेऊन फटाके फोडणे टाळावे त्याऐवजी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करावी.

2) यंदा दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजन करू नये, करायचे असल्यास ऑनलाइन आणि सोशल मीडिया माध्यमातून कार्यक्रम करावे.

3) सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ऐवजी संस्थांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरांवर भर दिला जावा.

4) धार्मिक स्थळ अद्याप खुली केलेली नाही त्यामुळे सण घरगुती पद्धतीने सध्या स्वरूपात साजरा करावा.

असेही सरकारच्या वतीनं सांगण्यात आले आहेत.

Updated : 6 Nov 2020 6:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top