Home > News > देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
X

देहविक्री करुन जगणाऱ्या महिलांना कोवीड-19 च्या प्रादुर्भाव कालावधीमध्ये अर्थसहाय्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार देहविक्री व्यवसायात काम करत असल्याची ओळख निश्चित केलेल्या महिलांना दरमहा 5 हजार रुपये आणि ज्या महिलांची मुले शाळेत जातात अशा महिलांना अतिरिक्त अडीच हजार रुपये अर्थसहाय्य कोणत्याही ओळखपत्राचा आग्रह न धरता वितरीत करण्यात येणार आहे.

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे. या अंतर्गत ऑक्टोबर ते डिसेंबर, 2020 या 3 महिन्यांच्या कालावधीसाठी 51 कोटी 18 लाख 97 हजार 500 रुपये इतका निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 32 जिल्ह्यांना एकूण 51 कोटी 18 लाख 97 हजार 500 रुपये इतका निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून उपलब्ध करण्यात येत आहे. नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (नॅको) या संस्थेकडून देहविक्री व्यवसायात कार्यरत ओळख निश्चित केलेल्या महिलांना दरमहा 5 हजार रुपये आणि ज्या महिलांची मुले शाळेत जातात अशा महिलांना अतिरिक्त 2 हजार 500 रुपये कोणत्याही ओळखपत्राचा आग्रह न धरता अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

देहविक्ररी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोरडे अन्नधान्य व रोख आर्थिक सहाय्य यासारख्या मुलभूत सेवा पुरविण्याच्या अनुषंगाने जिल्हानिहाय प्रस्ताव पुढील कार्यवाहीकरिता महिला व बाल विकास आयुक्त यांच्याकडे पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

Updated : 27 Nov 2020 3:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top