Home > News > CORONA UPDATE : राज्यातील रुग्ण संख्या कमी झाली असले तरी..

CORONA UPDATE : राज्यातील रुग्ण संख्या कमी झाली असले तरी..

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी जास्त असून काल दिवसभरात 02 हजार 219 नवीन कोरोनाबधितांची नोंद.रुग्ण संख्या कमी झाले असले तरी कोरोना नियमांचं पालन केलंच पाहिजे.

CORONA UPDATE :  राज्यातील रुग्ण संख्या कमी झाली असले तरी..
X

राज्यातील (Maharashtra) कोरोना (CORONA) रुग्णांची संख्या सातत्याने कमी जास्त होत आहे. त्यामुळे आता सर्व हळूहळू पूर्वपदावर येत असून. लसीकरण देखील मोठ्या प्रमाणावर होतं आहे. लवकरात लवकर सर्वांना लसीचे ( corona vaccine) दोन्ही डोस मिळावेत यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सध्या राज्यातील कोरोणा रुग्णांची संख्या पाहिली तर काल काल नवीनत 02 हजार 219 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 03 हजार 139 बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसभरात 49 कोरोनाबधित मृत्यू झाले आहेत. राज्याचा सद्याच्या मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.

आजपर्यंत एकूण 64 लाख 11 हजार 075 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकंदरीतच सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के एवढे आहे. राज्यात दुसरी लाट आता कमी होताना दिसत असली असून दिलासादायक बातमी अशी की दररोज कोरोनातुन मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. या सगळ्याचा विचार करता राज्यात आचा सरकारकडून निर्बंध हे शिथिल केले जात आहे. सध्या राज्यात शाळा, मंदिरे, चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू केलं जातं आहे. राज्यातील रुग्ण संख्या कमी झाले असले तरी कोरोना नियमांचं पालन केलंच पाहिजे.

Updated : 14 Oct 2021 1:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top