Latest News
Home > News > LOCKDOWN IMPACT : मुंबईत रुग्णसंख्या घटली तर राज्यात परिस्थिती जैसे थे

LOCKDOWN IMPACT : मुंबईत रुग्णसंख्या घटली तर राज्यात परिस्थिती जैसे थे

LOCKDOWN IMPACT : मुंबईत रुग्णसंख्या घटली तर राज्यात परिस्थिती जैसे थे
X

वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला असून त्याचे चांगले परिणाम मुंबईमध्ये पाहायला मिळत आहेत. सध्या मुंबईत करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85 टक्के एवढे असून 8,549 रुग्ण बरे झाले आहे. तर आज दिवसभरात 5,888 करोना रुग्ण बाधित झाले आहेत. सध्या मुंबईत एकूण सक्रीय रुग्ण 78,775 एवढे आहेत.

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्ण संख्येचा आकडा कमी होताना दिसत नाही. आज राज्यात 67 हजार 160 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर 63,818 रुग्ण आज बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 34,68,610 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 82.02 एवढे झाले आहे.

राज्यात आज 676 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.51% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,54,60,008 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 42,28,836 (16.61 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 41,86,675 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 29,246 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 6,94,480 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Updated : 24 April 2021 4:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top