Home > News > नागपूरमधील महामेट्रो इंटरनॅशनल बॅडमिंटन स्पर्धेचा चौथा दिवस

नागपूरमधील महामेट्रो इंटरनॅशनल बॅडमिंटन स्पर्धेचा चौथा दिवस

नागपूरमधील महामेट्रो इंटरनॅशनल बॅडमिंटन स्पर्धेचा चौथा दिवस
X

२०१७ ला सीनियर नॅशनल बँडमिंटन चॅलेंज नागपूरमध्ये पार पडले होते. पुन्हा एकदा यजमानपदाची धुरा सांभाळण्याची हि संधी नागपूरला मिळाली आहे .१३ ते १८ सप्टेंबर २०२२ दरम्यान विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे महामेट्रो इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंज हि स्पर्धा होत आहे .स्पर्धेचा चौथा दिवस सुरु आहे. नागपूरमद्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत १२ देशांतील बॅडमिंटनचे उगवते तारे आपल्या खेळाची चमक दाखवत आहेत.

बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन, बॅडमिंटन एशिया आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणारी ही स्पर्धा महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन नागपूर येथे पार पडत आहे .या स्पर्धेसाठी १२ देशांतील ५६० खेळाडूंची (११२ प्रति इव्हेन्ट) नोंदणी झालेली आहे. यात भारत (३४७), जपान (६), मलेशिया (१), मालदीव (१०), युगांडा (४), झाम्बिया (३), झिम्बाब्वे (१), अमेरिका (२), कॅनडा (१) , थायलंड (११), श्री लंका (५) आणि संयुक्त अरब अमिरात (UAE) (१) या देशांचा समावेश आहे.

या स्पर्धेत पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी असे इव्हेंट्स होणार आहेत . एकेरीमध्ये किरण जॉर्ज (६४ वे स्थान), महिला एकेरीमध्ये मालविका बनसोड (४७ वे स्थान), पुरुष दुहेरीमध्ये एम.आर. अर्जुन आणि ध्रुव कपिला (३५ वे स्थान), महिला दुहेरीमध्ये अश्विनी भट आणि शिखा गौतम (५३ वे स्थान) आणि मिश्र दुहेरीमध्ये ईशान भटनागर आणि तनिषा क्रेस्टो (४१ वे स्थान) हे खेळाडू सहभागी आहेत .

तर स्पर्धेचा समारोप १८ सप्टेंबरला होणार असून नितीन गडकरी चंद्रद्शेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. नागपूर जिल्ह्यातील विधान सभा आणि विधान परिषद सदस्यही उपस्थित राहणार आहेत.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अरुण लखानी म्हणाले, "पुन्हा एकदा जागतिक स्तरावरील स्पर्धा घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. आमच्या खेळाडूंसाठी आपल्याच देशात आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव घेण्याची ही एक उत्कृष्ट संधी आम्ही घेऊन आलो आहोत. ज्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धा प्रवास किंवा आर्थिक अडचणींमुळे खेळात आलेल्या नाहीत त्यांना आता जागतिक स्तरावरील खेळाडूंशी सामना करण्याची संधी मिळेल आणि मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे गुणही त्यांच्या नावे जमा होतील. या स्पर्धेलादेखील नागपूरकर २०१७ च्या सीनियर नॅशनल बँडमिंटन चॅलेंजसारखाच प्रतिसाद देतील अशी आशा आम्ही करत आहोत. या स्पर्धेतील विजेते आणि इतरही खेळाडू बॅडमिंटनचा उद्याचा चेहरा म्हणून पुढे येतील" असे मत अरुण लखाणी यांनी व्यक्त केले आहे.

त्याचबरोबर MBA आणि NDBA यांनी शहरातील सर्व क्रीडाप्रेमींना व विशेषतः विद्यार्थ्यांना स्पर्धेला येऊन उत्तम खेळाचे प्रदर्शन बघण्याचे आवाहन केले आहे.

Updated : 17 Sep 2022 7:02 AM GMT
Next Story
Share it
Top