Home > News > दुधानंतर आता मॅगी देखील महागली... दरांमध्ये तब्बल १९ टक्क्यांनी वाढ

दुधानंतर आता मॅगी देखील महागली... दरांमध्ये तब्बल १९ टक्क्यांनी वाढ

दिवसेंदिवस देशातली महागाई वाढतच चालली आहे. सिलेंडर, दुधानंतर आता सर्वांच्या लाडक्या मॅगीचे दरही वाढले आहेत.

दुधानंतर आता मॅगी देखील महागली... दरांमध्ये तब्बल १९ टक्क्यांनी वाढ
X

मार्च महिन्यात महागाईचा आलेख वाढतच आहे. अनेक वस्तुंच्या किंमतींमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यापार्श्वभुमीवर जीभेचे चोचले पुरवणाऱ्यांसाठी बॅडन्यूज समोर आली आहे तर ही खवैय्यांसाठी बॅडन्यूज आहे.

गेल्या काही दिवसांपासून महागाईचा आलेख वाढताना दिसत आहे. त्यातच घरगुती गॅस, खाद्यतेल यासह विविध उत्पादनांच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यापार्श्वभुमीवर खवैय्यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. त्यामध्ये मॅगीच्या दरात वाढ झाल्याने मॅगी महागली आहे.

अनेकांच्या पोटाची झटपट भूक भागवण्यासाठी मॅगीचा उपयोग केला जातो. मात्र आता हीच मॅगी महागली आहे. देशात मोठ्या प्रमाणावर ग्राहक असलेली नेस्ले मॅगीची किंमत 12 रुपयांवरून 14 रुपये झाली आहे. तर नेस्ले कंपनीने चहा, कॉफीसह दुधाच्या दरातही वाढ केली आहे. तर हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीनेही आपल्या उत्पादनांच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळे महागाईचा फटका ग्राहकांना बसत आहे.

नेस्ले मॅगी नूडल्सच्या किंमतीत 9 ते 16 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर 70 ग्रॅमचे मॅगी पॅकेट आता 12 रुपयांऐवजी 14 रुपयांना मिळणार आहे. तसेच नेस्लेने आपल्या A+ दुधाच्या दरात वाढ करत त्याची किंमत 78 रुपयांवरून 80 रुपये करण्याचे जाहीर केले त्यामुळे कोरोना महामारीनंतर महागाईचा वाढता आलेख आणि रशिया युक्रेन युध्दाचा परीणाम म्हणून वाढत्या इंधनांच्या दरापाठोपाठ किराणामाल आणि मॅगीसारख्या उत्पादनांच्या किंमती वाढल्याने त्याचा मोठा फटका ग्राहकांना बसणार आहे.

Updated : 15 March 2022 12:46 PM GMT
Next Story
Share it
Top