Home > News > रेणुका शहाणे यांच्या वाढदिवसानिमित्त माधुरी यांच्या हटके शुभेच्छा

रेणुका शहाणे यांच्या वाढदिवसानिमित्त माधुरी यांच्या हटके शुभेच्छा

रेणुका शहाणे यांच्या वाढदिवसानिमित्त माधुरी यांच्या हटके शुभेच्छा
X

Courtesy: Social Media

अभिनेत्री रेणुका शहाणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी एक वेगळी शक्कल लढवली. माधुरी दीक्षित यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये दोन्ही अभिनेत्री हम आपके है कौन या सिनेमातील 'लो चली में...' या गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

हम आपके हैं कौन या चित्रपटामध्ये या दोघींनी बहिणींची भूमिका साकारली होती. या चित्रपटामधील 'लो चली मै' हे गाणं खुपच गाजलं होतं. बकेट लिस्ट चित्रपटाच्या सेटवर रिक्रिएट झालेल्या याच गाण्याचा व्हिडीओ शेअर करत माधुरी यांनी रेणुका शहाणे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

"आपल्या एकत्र अशा अनेक आठवणी आहेत. हम आपके है कौन पासून अगदी बकेट लिस्टपर्यंत. तुझ्यासोबत वेळ व्यतीत करणं कायमच आनंद देणारं असतं. तुला वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा..." असं माधुरी यांनी आपल्या मध्ये म्हटलं आहे.


Updated : 2020-10-08T16:19:26+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top