Home > News > सिलेंडर संपल्यावर नो टेंशन, आर्धा तासात मिळणार डिलीव्हरी!

सिलेंडर संपल्यावर नो टेंशन, आर्धा तासात मिळणार डिलीव्हरी!

सिलेंडर संपल्यावर नो टेंशन, आर्धा तासात मिळणार डिलीव्हरी!
X

घरातला गॅस सिलेंडर अचानक संपल्यावर आणि घरात दुसरा सिलेंडर नसल्यावर महिलांना खूप मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. मात्र त्यांचा हा त्रास लवकरच कमी होणार आहे. येत्या १ फेब्रुवारी पासून इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीनं तात्काळ एलपीजी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या जर घरातला एलपीजी गॅस सिलेंडर संपला तर आपल्याला नव्या गॅस सिलेंडरसाठी २-३ दिवस वाट पाहावी लागते. बिझिनेस स्टँडर्डनं दिलेल्या माहितीनुसार, इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड प्रत्येक राज्यातील एक शहर किंवा जिल्हा निवडणार असून तिथेच आधी ही सेवा प्रायोगिक तत्वांवर सुरू करण्यात येणार आहे. या सेवेच्या माध्यमातून कंपनी ३० ते ४५ मिनिटांत ग्राहकांना एलपीजी सिलेंडर घरपोच देणार आहे.

इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेडनं दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांसाठी ही खास सेवा येत्या १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ही सेवा लवकरात लवकर सुरू करता येईल यासाठी मोठ्या पातळीवर कंपनी काम करत आहे. इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड त्यांच्या ग्राहकांना इंडेन ब्रँड अंतर्गत सिलेंडर पुरवते. सध्या देशामध्ये २८ कोटी एलपीजी ग्राहक आहेत, त्यापैकी १४ कोटी ग्राहक इंडेन गॅस वापरतात.

इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तत्काळ एलपीजी सेवेचा किंवा 'सिंगल डे डिलीव्हरी सर्व्हिस'चा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना थोडीफार किंमत मोजावी लागणार आहे. हे शुल्क नेमका किती असेल? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर अद्याप काम सुरू असल्याची माहिती सरकारी तेल कंपन्यांकडून देण्यात आली आहे.

Updated : 13 Jan 2021 2:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top