Home > News > Lockdown : सोन्याचे उच्चांकी भाव, सोनं घेतंय कोण?

Lockdown : सोन्याचे उच्चांकी भाव, सोनं घेतंय कोण?

Lockdown : सोन्याचे उच्चांकी भाव, सोनं घेतंय कोण?
X

कोरोनाच्या महामारीमूळ शेअर बाजार , तसच कच्या तेलाच्या किमती प्रचंड घसरल्याने गुंतवणूकदारांचा ओढा सोन्याकडे वळला आहे. यामुळं सोन्याचा भाव रोज नवनवे उच्चांकावर पोहचत आहे. लोकडाऊनच्या काळात म्हणजे गेल्या 28 दिवसात 20 टक्के सोन्याच्या वाढ झाल्याचं जाणकार सांगतात. सोने चांदीच्या भावात रोज चढउतार सुरू आहेत काल प्रति तोळा सोन्याचे भाव 47,000 हजार पर्यंत पोहचले होते, तर चांदी 45 हजार रुपये प्रति किलोग्राम साठी उच्चांकी भाव होता आज मात्र यात घट होऊन 46,600 सोन्याचे भाव तर चांदी 42,300 हाजारावर आहे.

[gallery bgs_gallery_type="slider" ids="12425,12426,12427"]

हे ही वाचा

CoronaVirus: बचत गटातील महिलांच्या 1-1 रुपयाने बनली लाखोंची रक्कम

काटेकोर नियमांसह दारुविक्री सुरु होणार?

विशेष म्हणजे लॉकडाऊन मूळ देशभरातील सराफा बाजार बंद आहेत. सर्वसामान्य ग्राहक सोने खरेदीही बंद आहे.

मात्र व्यापारी वर्ग शेअर मार्केट सारखेच 'मल्टी कमोडिटी एक्सचेंज' मार्केट मध्ये सोने खरेदी विक्रीचे व्यापार करत आहे, काही जण ह्याच मार्केटच्या माध्यमातून सोन्याचा सट्टा खेळला जात आहे, यामुळेही सोन्याच्या भावात रोज चढउतार होत आहेत. प्रत्येक्षात सोने देवाण घेवणीचा व्यवहार न करता ऑन लाईन आणि कागदोपत्री व्यवहार सुरू आहेत.

मार्च ते जून या महिन्यांच्या दरम्यान सणवार तसच लग्नसराई मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी विक्री होते मात्र लॉकडाऊन मूळ गुढीपाडवा ला सोन्याची खरेदी केली नाही, येणाऱ्या अक्षयतृतीया लाही तीच परिस्थिती राहणार असल्याने 1000 कोटींचा फटका सराफा बाजाराला बसणार आहे. अस जाणकारांच म्हणणं आहे.

संतोष सोनवणे

Updated : 22 April 2020 10:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top