Home > News > #LockUpp : ''अब मेरी बारी है'' म्हणतं कंगना रनौतचे OTT वर पदार्पण..

#LockUpp : ''अब मेरी बारी है'' म्हणतं कंगना रनौतचे OTT वर पदार्पण..

स्वतःच नेहमी वादग्रस्त विधाने करून चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रनौत आता 16 वादग्रस्त लोकांना घेऊन येणार OTT प्लॅटफॉर्मवर..

#LockUpp : अब मेरी बारी है म्हणतं कंगना रनौतचे OTT वर पदार्पण..
X

अभिनेत्री कंगना राणौत लवकरच एकता कपूरचा आगामी रिअॅलिटी शो 'लॉक अप' होस्ट करताना दिसणार आहे. या सिरीजचा टिझर नुकताच लॉन्च झाला आहे. या सिरीज मधून कंगनाचेही डिजिटल डेब्यू असणार आहे.

ALTBalaji आणि MX Player या OTT प्लॅटफॉर्मवर 'लॉक अप' 72 दिवस 24x7 स्ट्रीम करेल. या ७२ दिवसांत कंगना फक्त शनिवार आणि रविवारी दिसणार आहे. हे पाहता कंगना या शोच्या 22 एपिसोडमध्ये दिसणार आहे.

शोमधील सर्व 16 सेलिब्रिटी स्पर्धकांना तुरुंगात टाकले जाईल.

वादग्रस्त लोकांना या शोमध्ये बोलवलं जाणार असून याचे सूत्रसंचालन अभिनेत्री कंगना रनौत करणार आहे. रिलीज झालेल्या टिझर मध्ये कंगना म्हणते आहे की, ''या जगात दोन प्रकारचे लोक आहेत. ज्यामध्ये एक जे मला पसंत करता आणि दुसरे जे स्ट्रुगल करता व नेहमी माज्याबद्दल बाईट साईट म्हणून बातम्यांमध्ये राहतात. असा तिरस्कार करणार्यांनी ज्यांनी माझा आवाज दवण्याचा प्रयत्न केला व माझ्यावर घराणेशाहीचा आरोप केला. माझ्या आयुष्याला 24 तास चालणारा एक शो करून ठवलं. पण आता माझी वेळ आहे. मी घेऊन येत आहे रियालिटी शोचा बाप.'माय जेल माय रुल्स'..असा टिझर लॉन्च करत या शो मध्ये वादग्रस्त 16 सेलिब्रिटी असणार असल्याचं तिने सांगितलं आहे.

आता हे 16 वादग्रस्त लोक कोण असणार याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Updated : 14 Feb 2022 8:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top