Latest News
Home > News > मिशन बिगीन अगेन : लोकलमध्ये लेडीज फर्स्ट

मिशन बिगीन अगेन : लोकलमध्ये लेडीज फर्स्ट

मिशन बिगीन अगेन : लोकलमध्ये लेडीज फर्स्ट
X

महाराष्ट्र सरकारने नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबईतील लोकल ट्रेनमधून उद्यापासून सर्व महिलांना प्रवास करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. लोकल प्रवासासाठी महिलांना क्यू आर कोडची आवश्यकता लागणार नाहीये. मात्र, लोकल प्रवासासाठी महिलांना वेळेची मर्यादा असणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत महिलांना लोकलने प्रवास करता येणार आहे. तर त्यानंतर सायंकाळी ७ ते शेवटची लोकल सुरू असेपर्यंत महिला प्रवासी लोकलने प्रवास करु शकणार आहेत. मुंबई आणि एमएमआर क्षेत्रातील महिला आता मुंबईतील लोकलने प्रवास करु शकणार आहेत.

अनलॉकिंगदरम्यान सर्व काही सुरळीत होत असताना मुंबई लोकल मात्र सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनाच मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र राज्य सरकारने आता महिलांनाही मुंबई लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. सरकारने त्याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केलं आहे.

Updated : 2020-10-16T17:59:28+05:30
Next Story
Share it
Top