Home > News > तरुणाचं तोंड ट्रेन खाली गेलं आणि.... कल्याण स्थानकात घडला मोठा अपघात

तरुणाचं तोंड ट्रेन खाली गेलं आणि.... कल्याण स्थानकात घडला मोठा अपघात

तरुणाचं तोंड ट्रेन खाली गेलं आणि.... कल्याण स्थानकात घडला मोठा अपघात
X

धावत्या ट्रेन मध्ये चढण्याचा प्रयत्न करू का अस आवाहन रेल्वेकडून वारंवार करण्यात येत असला तरी काही प्रवाशांकडून धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न सुरूच आहे .एक धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात असलेला एक प्रवासी तोल जाऊन एक्सप्रेस व फलाटाच्या मध्ये आला मात्र कर्तव्यावर असलेल्‍या एम एस एफ जवानाच्या सतर्कतेमुळे या प्रवासाचा जीव वाचलाय. ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली .

आज दुपारी पावणे बाराच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर गोदान एक्स्प्रेस आली .एक्स्प्रेस सुरू होताच एका प्रवाशाने एक्सप्रेस मध्ये चढण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा तोल गेल्याने तो एक्सप्रेस आणि फलाटाच्या मध्ये आला. गाडीच्या मधल्या जागेतून तो गाडीखाली येण्याची शक्यता होती

काही अंतरावर तो फरफटत गेला .यावेळी प्लॅटफॉर्म वरील प्रवाशांनी आरडाओरड केली. याच दरम्यान स्टेशनवर कर्तव्यावर असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाचे रोशन जाधव व सुरक्षा बलातील एका महिला कर्मचाऱ्याचे लक्ष गेलं त्यांनी तत्काळ या प्रवाशाला खेचून त्याचे प्राण वाचवले. सुदैवाने या प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली होती त्याच्यावर उपचार करून त्याला सोडून देण्यात आलं .रोशन जाधव यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधान व धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे .

Updated : 18 April 2022 3:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top