Home > News > तू निवडूनआली म्हणताच, ती लग्न अर्ध्यावर टाकून मतमोजणी केंद्रात पोहोचली

तू निवडूनआली म्हणताच, ती लग्न अर्ध्यावर टाकून मतमोजणी केंद्रात पोहोचली

तू निवडूनआली म्हणताच, ती लग्न अर्ध्यावर टाकून मतमोजणी केंद्रात पोहोचली
X

रविवारी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूककीसोबतच काही राज्यांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सुद्धा समोर आले आहेत.यादरम्यान अनेक गमतीदार गोष्टी सुद्धा पाहायला मिळाल्या.
उत्तर प्रदेशमधील रामपूर मतमोजणी केंद्रावर मतमोजणी सुरू असताना एक नववधू लग्नाच्या ड्रेसमध्ये थेट मतमोजणी केंद्रात पोहोचली. तिला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
मात्र नंतर समजले की, मिलक ब्लॉकच्या वॉर्ड क्र. १३५ मधून निवडणूक लढवणाऱ्या पूनम शर्मा हिचा विवाह मतमोजणीवेळी सुरू होता. त्याचवेळी तिला ती निवडणुकीत विजयी झाल्याची माहिती मिळाली. निवडणूक जिंकल्याची बातमी कळताच तिचा आनंद गगनाला भिडला आणि लग्नाचे विधी अर्ध्यावरच सोडून ती निवडणूक जिंकल्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी मतमोजणी केंद्रात पोहोचली.

पूनम शर्मा हीच लग्न गंगासन नावाच्या व्यक्ती सोबत होणार होते. विशेष म्हणजे,तिच्या विवाहाची तारीख ठरलेल्या 2 मे रोजीचं निवडणुकीचा निकाल होता.
विवाह सुरू असतानाच पूनमला ती निवडणूक जिंकल्याची बातमी मिळाली. तेव्हा ती वधूच्या वेशातच निवडणूक जिंकल्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी मतदान केंद्रात पोहोचली.

तिला पाहून काहीवेळ उपस्थित सगळेच काही वेळेसाठी आश्चर्यचकित झाले होते. तर विवाहाचं प्रमाणपत्र घेऊन लग्नमंडपात पोहोचल्यावर पूनम हिने विवाहातील उर्वरित विधी पूर्ण केले. लग्न आणि निवडणूक जिंकण्याचा आयुष्यातील सर्वात मोठे दोन्ही आनंद तिला एकाच वेळी मिळाले.

Updated : 4 May 2021 6:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top