Home > News > लेडी सिंघम पक्षांच्या प्रेमातून मानवतेचा देत आहेत आगळावेगळा संदेश

लेडी सिंघम पक्षांच्या प्रेमातून मानवतेचा देत आहेत आगळावेगळा संदेश

लेडी सिंघम पक्षांच्या प्रेमातून मानवतेचा देत आहेत आगळावेगळा संदेश
X

सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. अशात जंगलात वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पशु-पक्ष्यांची गैरसोय होऊ नये म्हणुन स्वतःच्या पदरचे पैसा खर्च करून वन्यजीव पशु-पक्षी,प्राणी आणि तक्षम वन्य जीवांची पोटाची खळगी भरण्यासाठी ऑन डिवटी झटणारी वन वाघीण सावळी वनक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कुऱ्हा येथील बीटच्या वनरक्षक चर्चेचा विषय बनली आहे.या वन विभागातील वाघीण चे नाव स्वाती अघम असे आहेत.अंत्यत घनदाट जंगलात अंगावर वनविभागाची खाकी वर्दी चढवून लाकूड तोडणाऱ्यासह अन्य चोरट्यांना घाम फोडणारी वनरक्षक म्हणुन स्वाती अघम जिल्ह्यात चर्चेला जात आहे.

सावळी वन क्षेत्रात वन रक्षक पदावर काम करणाऱ्या स्वाती आगम यांचे पक्षी प्रेम सध्या जिल्ह्यत चर्चेचा विषय ठरला आहे.सामान्य कुटुंबातील अनधा ह्या २०११ मध्ये वनविभागात वनरक्षक म्हणून नोकरीला लागल्या सध्या स्वाती अघम ह्या सावळी वन परिक्षेत्रात कार्यरत आहेत. येथे त्यानी त्यांच्या कडे असलेल्या क्षेत्रात पशु-पक्षांना पिण्यासाठी पाणी व चारा उपलब्ध करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. जंगलात स्वतःच्या खर्चाने पक्षांसाठी पाण्याचे भांडे व धान्य त्या नियमित ठेवतात त्यामुळे पक्षांच्या किलबिलाट येथे पहायला मिळतो.घनदाट जंगलात कुठल्याही भीती शिवाय त्या वनरक्षण तर करतातच पण सोबत पक्षांच्या प्रेमातून मानवतेचा आगळावेगळा संदेश देखील देत असल्याने वृक्षा सोबत पक्षांवर जीव लावणारी अनोखी स्वाती अघम नावाची वाघीण चर्चेचा विषय बनली आहे.

Updated : 29 April 2022 3:03 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top