Latest News
Home > News > महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या आरोग्यवारी अभियानाची सुरुवात

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या आरोग्यवारी अभियानाची सुरुवात

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या आरोग्यवारी अभियानाची सुरुवात
X

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या आरोग्यवारी अभियानाची सुरुवात १९ जून रोजी करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून आज पुलगेट ते गाडीतळ हडपसर अशी एकदिवशीय वारी मध्ये अध्यक्षा रुपाली चाकणकर या सहभागी झाल्या होत्या. आयोगाच्या पथकाने महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या स्वछता गृह व सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन असलेल्या ठिकाणी भेटी देऊन तेथील पाहणी केली.
तसेच वारकरी महिलांशी संवाद साधत त्यांना काही अडचणी व तक्रारी असल्यास त्याबद्दल आयोगाशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले. यावेळी राज्य महिला आयोगाच्या माहिती पुस्तिकेचे वाटप वारीतील महिलांना करण्यात आले तसेच वारीतील महिला वारकऱ्यांशी संवाद साधला.
या माहितीपुस्तिकेमध्ये राज्य महिला आयोगाशी संबंधित सर्व लोकोपयोगी माहिती त्यामध्ये देण्यात आलेली असून त्यामध्ये आयोगाची भूमिका , अधिकार व कार्ये महिलांशी संबंधित प्रमुख कायद्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. राज्यातील कोणत्याही महिलेस आयोगाशी संपर्क साधायचा असल्यास किंवा तक्रार दाखल करायची असल्यास आयोगाच्या मुख्य कार्यालयाचा पत्ता तसेच सर्व विभागीय कार्यालयांचे पत्ते तसेच संपर्क क्रमांक यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

Updated : 24 Jun 2022 4:36 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top