Home > News > #LataMangeshkar : सुरेल युगाची अखेर, लता मंगेशकर यांचे निधन

#LataMangeshkar : सुरेल युगाची अखेर, लता मंगेशकर यांचे निधन

#LataMangeshkar : सुरेल युगाची अखेर, लता मंगेशकर यांचे निधन
X

भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचं आज सकाळी निधन झालं आहे. त्या ९२ वर्षाच्या होत्या. प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

गेली काही दिवस लतादिदींचा जीवनाशी संघर्ष सुरु होता. त्यांना ८ जानेवारीला कोरोनाची लागण झाली होती. त्यांना करोनाची सौम्यं लक्षणं जाणवल्यानंतर त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. उपचारासाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण उपचादारादरम्यान अवयव निकामी झाल्यानं त्यांची प्राणज्योत मालवली.

लता मंगेशकर यांचे आज सकाळी ८.१२ मिनिटांनी निधन झाले.सर्व अवयव निकामी होत गेले. त्यानंतर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.

देशभरातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्ल शोकसंदेश दिले आहेत. आज दुपारनंतर त्यांचे पार्थिक शिवाजी पार्कवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिवाजी पार्क स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येण्यात येणार आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्व आणि देशावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र देखील अंत्यदर्शनासाठी मुंबईत येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Updated : 6 Feb 2022 6:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top