Home > News > 'लाल सिंग चड्ढा' ऑनलाइन लीक, तरीही पहिल्या दिवशी केली इतकी कमाई..

'लाल सिंग चड्ढा' ऑनलाइन लीक, तरीही पहिल्या दिवशी केली इतकी कमाई..

लाल सिंग चड्ढा ऑनलाइन लीक, तरीही पहिल्या दिवशी केली इतकी कमाई..
X

अभिनेता आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' काल (11 ऑगस्ट) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. पण हा चित्रपट आता रिलीज झाल्यानंतर काही तासांतच ऑनलाइन लीक झाला आहे.


'लाल सिंह चड्ढा' ची फुल एचडी आवृत्ती TamilRockers, Filmyzilla, Movierulz, Telegram आणि इतर अनेक वेबसाईटवर लीक झाली आहे. लोक या साइट्सवरून चित्रपट सहजपणे विनामूल्य डाउनलोड करत आहेत. याचा परिणाम चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होऊ शकतो. चित्रपट लीक झाल्यामुळे निर्मात्यांना करोडो रुपयांचे नुकसानही सहन करावे लागू शकते. अलीकडच्या काळात 'शमशेरा', 'एक व्हिलन रिटर्न्स' सारखे अनेक चित्रपटही पायरसीचे बळी ठरले आहेत.

या चित्रपटाद्वारे आमिर खान चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित 'लाल सिंह चड्ढा' मध्ये आमिर व्यतिरिक्त करीना कपूर खान, मोना सिंह आणि नागा चैतन्य देखील मुख्य भूमिकेत आहेत. लाल सिंग चड्ढा हा 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या टॉम हँक्सच्या फॉरेस्ट गंपचा अधिकृत हिंदी रिमेक आहे.

पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमाई किती केली?

'लाल सिंह चड्ढा'सोबतच अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन' हा चित्रपटही थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हे दोन्ही चित्रपद एकत्रच प्रदर्शित झाल्यामुळे बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांची कमाई काही खास होताना पाहायला मिळालेली नाही. आता पहिल्या वीकेंडला दोन्ही चित्रपटांचा व्यवसाय किती होतो हे पाहावे लागेल.

मात्र अॅडव्हान्स बुकिंगमध्ये आमिर खान अक्षय कुमारच्या पुढे होता. 'लाल सिंह चड्ढा'ने अॅडव्हान्स बुकिंगवरून 6 दिवसांत सुमारे 13 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. त्याचवेळी 'रक्षा बंधन'ने 6 दिवसांत केवळ 6 कोटींची कमाई केली. त्यानुसार, पहिल्या दिवशी कलेक्शनच्या बाबतीत फक्त 'लाल सिंग चड्ढा' 'रक्षा बंधन'च्या पुढे राहू शकतात.

Updated : 12 Aug 2022 7:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top