Home > News > आठवीची मुलगी दहा हजार वर्षातील कोणताही वार अचूक सांगते काही क्षणात

आठवीची मुलगी दहा हजार वर्षातील कोणताही वार अचूक सांगते काही क्षणात

आठवीची मुलगी दहा हजार वर्षातील कोणताही वार अचूक सांगते काही क्षणात
X

एखाद्या महिन्यातील 10 दिवसापूर्वीच्या तारखेचा वार विचारला तर आपल्याला कॅलंडर पाहावे लागते. मात्र यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा येथील एका 14 वर्षीय मुलीचे टॅलेंट पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. या मुलीला 10 हजार वर्षातील कोणतीही तारीख विचारल्यास ती नचुकता 5 सेकंदात त्या तारखेचा वार सांगते. तिच्या भन्नाट बुद्धीची दखल ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डने सुद्धा घेतली आहे.

पांढरकवडा येथील लक्ष्मी पंकज चिंतावार ही गुरुकुल शाळेच्या 8 व्या वर्गाला शिकत आहे. तिला हे कसं शक्य झालं असं जेव्हा विचारलं तेव्हा ती म्हणते, गणित या विषयाची मला फार आवड आहे. गणितात काही तरी विशेष करावं आणि आई वडिलांच नाव मोठं करावं अशी माझी सुरुवाती पासूनच इच्छा होती." काहीतरी करायचं या जिद्दीने ती अनेक प्रयत्न करत होती. यावेळी तिने ती ज्या प्रमाणे वार सांगते असाचं एक व्हिडिओ युट्युबवर पहिला आणि त्यानंतर तिला या बाबत गोडी निर्माण झाली.लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असल्याने लक्ष्मीने हा विषय हाती घेतला. त्यासाठी तिने काही वर्षातील तारखांचा अभ्यास केला. आणि पाहतात पाहता ती तारीख सांगितली की वार सांगायला लागली. नंतर काही दिवसातच तीने 10 हजार वर्षातील कोणतीही तारीख सांगितली तर ती न चुकता त्या दिवसाचा वार अवघ्या 5 सेकंदात सांगायला सांगते..

लक्ष्मीला या व्यतिरिक्त गायन, खेळणं, खेळातही रुची आहे. लॉक डाऊनमध्ये सर्व शाळा बंद होत्या त्यामुळे मुलं घरीच होती. बऱ्याच मुलांना मोबाईलचा लळा लागला. त्यातील काहींनी मोबाईलचा चांगला उपयोग केला त्यातलीच लक्ष्मी एक आहे. लक्ष्मीने युट्युब वरून या प्रयोगाला सुरुवात केली.त्यात तिला आवड निर्माण झाली. ती येवढ्यावरच थांबली नाही तर विक्रमाची दिशेने वाटचाल केली.ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिच्या नावाची नोंद झाली.लक्ष्मी च्या यशाने शाळेतील शिक्षक ही भारावून गेले आहे.


Updated : 6 April 2022 8:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top