Home > News > संदीप देशपांडे यांच्यावर गृहराज्य मंत्र्यांचे कारवाईचे निर्देश..

संदीप देशपांडे यांच्यावर गृहराज्य मंत्र्यांचे कारवाईचे निर्देश..

मनसे नेते संदीप देशपांडे यांना पोलिस ताब्यात घेत असताना. त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्या. या घडलेल्या घटनेनंतर आता गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी कारवाईचे निर्देश दिले आहेत.

संदीप देशपांडे यांच्यावर गृहराज्य मंत्र्यांचे कारवाईचे निर्देश..
X

राज्यात पहाटेपासून अजान विरुद्ध हनुमान चालीसा असं आंदोलन मनसे कार्यकर्त्यांकडून आपल्याला पाहायला मिळतंय. अशात पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केलीये. संदीप देशपांडेंना ताब्यात घेत असताना झालेल्या झटापटीत महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्या आहेत. या प्रकाराची दखल गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी घेतली आहे. त्यांनी ट्विट करत घडलेल्या गंभीर प्रकाराबाबत कारवाई करण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिले असल्याचे सांगितले आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे शिवतीर्थ बाहेर पत्रकारांशी बोलत होते. इतक्यात पोलीस त्यांना ताब्यात घेण्यासाठी आले. संदीप देशपांडे पोलिसांशी बोलत बोलत त्यांच्या गाडीपाशी गेले आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांना दूर लोटत गाडी सुरू करत निघून गेले. दुसरीकडे संदीप देशपांडे यांच्या सोबत असलेले संतोः धुरी देखील तिथून पसार झाले. या सगळ्या झटापटीत महिला पोलीस कर्मचारी खाली पडल्या यात त्या जखमी झाल्या. या महिला पोलिसांना उपचारांसाठी दवाखान्यात नेण्यात आले आहे.

हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी आता ऍक्टिव्हेट केला आहे स्वीट मध्ये काय म्हंटल आहे की, मनसेचे नेते श्री. संदिप देशपांडे यांनी आज मुंबई पोलीस दलातील महिला अधिकारी यांचेशी केलेल्या गैरवर्तनाबद्दलची माहिती मी घेतली असून सदरच्या घडलेल्या गंभीर प्रकाराबद्दल तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्त श्री. संजय पांडे यांना दिले आहेत.


Updated : 4 May 2022 11:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top