Home > News > Video: चालत्या ट्रेनमध्ये महिला कॉन्स्टेबलची छेडछाड काढणाऱ्या नशेडी युवकाला लाठ्याच्या प्रसाद

Video: चालत्या ट्रेनमध्ये महिला कॉन्स्टेबलची छेडछाड काढणाऱ्या नशेडी युवकाला लाठ्याच्या प्रसाद

Video: चालत्या ट्रेनमध्ये महिला कॉन्स्टेबलची छेडछाड काढणाऱ्या नशेडी युवकाला लाठ्याच्या प्रसाद
X

चालत्या ट्रेनमध्ये नशा करून छेडछाड काढणाऱ्या तरुणाला महिला कॉन्स्टेबलने 'खाकी' दाखवत चांगलाच प्रसाद दिला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना 10 जुलै रोजी वडाळा रेल्वे स्थानकावर घडली आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण ट्रेनच्या गेटवर उभा राहून नशा करत होता. तरुणाला नशा करताना पाहून महिला कॉन्स्टेबलने त्याला ट्रेनमधून खाली उतरण्यास सांगितलं. पण हा तरुण ऐकायला तयार नव्हता. एवढच नाही तर, नशेत असलेल्या या तरुणाने महिला कॉन्स्टेबलला उलट-सुलट बोलत वाद घालत, छेडछाड काढायला सुरुवात केली. मग काय संतापलेल्या महिला कॉन्स्टेबलने तरुणाला त्याच्या कृत्यासाठी काठीचा चांगलाच प्रसाद दिला आहे. तसेच त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे.

Updated : 15 July 2021 7:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top