Home > News > पती समीर वानखेडे अडचणीत असताना पत्नी क्रांती रेडकर यांचा व्हिडिओ व्हायरल..

पती समीर वानखेडे अडचणीत असताना पत्नी क्रांती रेडकर यांचा व्हिडिओ व्हायरल..

पती समीर वानखेडे अडचणीत असताना पत्नी क्रांती रेडकर यांचा व्हिडिओ व्हायरल..
X

आर्यन खान ड्रग्स प्रकरण सर्वांना आठवत असेल, बरे तुम्ही ते विसरला असाल तरी मागच्या चार दिवसांपासून माध्यमांच्या माध्यमातून तुम्हाला या प्रकरणाची पुन्हा आठवण झाली असेल. आता हे प्रकरण पुन्हा चर्चेत आहे याचं कारण तुम्हाला माहीत नसेल तर थोडक्यात सांगतो, आर्यन खान यांना ड्रग्स प्रकरणात सीबीआयने पकडलं होतं. याच प्रकरणात एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे अडचणीत सापडले आहेत. शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात सोडवण्यासाठी तब्बल २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आणि सध्या सीबीआय कडून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे आता समीर वानखेडे स्वतःच अडचणी सापडले आहेत आणि ते अडचणीत असताना त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. आता नवरा अडचणीत असताना बायकोने समाज माध्यमांवर पोस्ट केलेल्या व्हिडिओची चर्चा का आहे हेच आपण पाहणार आहोत.

आयआरएस अधिकारी आणि एनसीबीचे माजी झोन डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खान प्रकरणात खंडणी घेतल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. सध्या सीबीआय समीर वानखेडे यांची चौकशी करत आहे. खरंतर आर्यन खान प्रकरणानंतर एक डॅशिंग अधिकारी म्हणून समीर वानखेडे यांची प्रतिमा तयार झाली होती, पण त्यांच्या याच प्रतिमेवर त्यावेळी देखील अनेकांनी संशयाचे बोट उठवलं होतं.. आता तर सीबीआयनेच समीर वानखेडे यांच्या वरती असे गंभीर आरोप केले आहेत. बाकी हे सगळं होत असताना समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतो आहे. नवऱ्यावर ओढवलेल्या या कठीण काळात क्रांती रेडकर नक्की काय म्हणतात पहा...
तर पतीवर ओढवलेल्या संकटानंतर अभिनेत्री क्रांती रेडकर यांचा हाच व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर जरूर करा.. धन्यवाद...

Updated : 25 May 2023 6:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top