Home > News > केतकी चितळेच्या अडचणीत वाढ; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

केतकी चितळेच्या अडचणीत वाढ; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

केतकी चितळेच्या अडचणीत वाढ; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
X

केतकी चितळे हिला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज तिला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. तिच्यावर कळवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असून या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा करत होती. आज पोलीस कोठडी चा शेवटचा दिवस असल्याने तिला न्यायालयात हजर करून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांना सध्या ठाणे कारागृहात रवाना करण्यात आले आहे.

यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त न्यायालय परिसरामध्ये तैनात होता. गुन्हे शाखेचे केतकीच्या कस्टडी ची मागणी केली आहे. तर तिचा मोबाईल आणि लॅपटॉप सायबर शाखेकडे तपासासाठी देण्यात आले आहेत त्याचा अहवाल अजून बाकी आहे तो आल्यानंतर पुढील तपास केला जाईल त्यामुळे तिच्या आता कोठडीत वाढ करून देण्याची मागणी पोलिसांनी केली होती. मात्र न्यायालयाने सर्व कागदपत्रे तपासून तिला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

फेसबुकवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर तिला पोलिसांनी कळंबोली येथून अटक केली होती. अटक झाल्यानंतर तिचा प्रवास पहिला गुन्हे शाखा आणि ठाणे नगर पोलिस ठाणे असा होता. आज न्यायालयातुन केतकीला 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे. आता केतकीला ठाणे कारागृहात आणण्यात आले आहे. केतकी हिचा ताबा मुंबई पोलीस घेऊ शकतात. त्यामुळे केतकीच्या अडचणीत वाढ़ होताना दिसत आहे.

Updated : 18 May 2022 8:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top