Home > News > मुलींनी घातलेला ड्रेस 'सेक्सी' आहे कि नाही हे कोण ठरवणार ?

मुलींनी घातलेला ड्रेस 'सेक्सी' आहे कि नाही हे कोण ठरवणार ?

मुलींनी घातलेला ड्रेस सेक्सी आहे कि नाही हे कोण ठरवणार ?
X

केरळ मध्ये एक आश्चर्यजनक निर्णय Kozhikode Sessions Court ने घेतला आहे . न्यायालयाच्या म्हणण्यानुसार 'sexually provocative dresses'अर्थात सेक्सी ड्रेस घातलेल्या महिलांच्या तक्रारी या Sexual Harassment म्हणून प्रथमदर्शनी घेतल्या जाऊ शकत नाहीत.असे मत केरळ येथील या न्यायालयाने मांडले आहे .

काय आहे नेमकं प्रकरण ?

केरळ मध्ये लेखक, समाजसेवक Civic Chandran यांच्यावर फिर्यादीने आरोप केला आहे की आरोपीने तरुण महिला लेखिका असलेल्या तक्रारदाराशी लैंगिक कृत्य केले आणि फेब्रुवारी 2020 मध्ये नंदी बीचवर आयोजित केलेल्या शिबिरात तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.त्याप्रमाणे कोयलंडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354A(2), 341 आणि 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

यावर 74 वर्षीय आरोपीने जामीनासाठी अर्ज करताना महिलेचे फोटो शेअर केले होते. त्या फोटो मध्ये महिलेने घातलेले कपडे हे 'लैंगिक उत्तेजक' असल्याचं सांगण्यात आले आहे. अशा प्रकरणामध्ये कलम 354A हे प्रथम दर्शनी लावले जाऊ शकत नाही. असे Kozhikode Sessions Court कडून सांगण्यात आले आहे.

74 वर्षीय शारिरीकदृष्ट्या अक्षम आरोपी तक्रारकर्त्याला जबरदस्तीने आपल्या मांडीवर बसवून तिचे स्तन दाबू शकतो यावरही न्यायालयाने अविश्वास व्यक्त केला.

यावर नक्की कोणता ड्रेस लैंगिक उत्तेजक असतो किंवा तो कोण ठरवणार असे अनेक तीव्र प्रश्न प्रितिक्रियेत समाविष्ट आहेत .

Updated : 2022-08-17T14:37:57+05:30
Next Story
Share it
Top