Home > News > करुणा शर्माचा एक फोन आणि पोलीस घटनास्थळी

करुणा शर्माचा एक फोन आणि पोलीस घटनास्थळी

करुणा शर्माचा एक फोन आणि पोलीस घटनास्थळी
X

करुना शर्मा यांच्या गाडीवर २३ ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. तसेच दरवाजा उघडण्याचा प्रयत्न ही केला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात एनसीआर (अदखलपात्र) दाखल करण्यात आला आहे.करुणा मुंडे या शहरातील कॅनॉल रोडवरील उत्तमनगर भागात राहता

बुधवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी रात्री त्या त्यांच्या गाडीतून (एमएच 23 एडी 3461) पीए अजयकुमार देडे याच्यासह मेडीकलवर थायराईडचे औषध आणण्यासाठी निघाल्या होत्या. घरापासून काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना लक्षात आले की गाडीचे टायर पंक्चर आहे. त्यामुळे परत घरी जाण्यासाठी निघाल्या असता तीन अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आले व त्यातील एकाने गाडीच्या समोरील काचेवर दगड मारला. यात काच फुटला. तर दुसऱ्या दोघांनी दोन्ही बाजुचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्यांना दरवाजा उघडला नाही. एव्हढ्यात करुणा मुंडे यांनी 100 नंबर डायल केला. त्या पोलिसांशी संपर्क करत असल्याचे सदर हल्लेखोरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तथून पळ काढला. या बाबत करुणा शर्मा यांनी गुरुवार दिनांक २४ऑगस्ट रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल होत तक्रार दिली. त्यानुसार एनसीआर दाखल करण्यात आला आहे.


Updated : 25 Aug 2023 7:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top