Home > News > धनंजय मुंडेंना ५ कोटी द्या नाहीतर बदनामी करेन म्हणणाऱ्या रेणू शर्माला अटक, करूणा मुंडेंची बहिण आहे रेणू शर्मा

धनंजय मुंडेंना ५ कोटी द्या नाहीतर बदनामी करेन म्हणणाऱ्या रेणू शर्माला अटक, करूणा मुंडेंची बहिण आहे रेणू शर्मा

धनंजय मुंडेंना ५ कोटी द्या नाहीतर बदनामी करेन म्हणणाऱ्या रेणू शर्माला अटक, करूणा मुंडेंची बहिण आहे रेणू शर्मा
X

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना रेणू शर्मा या महिलेने धमकी देऊन खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला होता फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय फोन नंबर वरून पाच कोटींची रोख रक्कम आणि पाच कोटींच्या दुकानाची मागणी शर्माना धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती ते न दिल्यास समाज माध्यमांवर बदनामी करण्याची धमकी दिली होती

धनंजय मुंडे यांनी तातडीने मुंबई क्राईम ब्रँच मध्ये धाव घेत सदर महिलेविरुद्ध खंडणी मागितल्याची तसेच ब्लॅकमेलिंग केल्याची पुराव्यांसह तक्रार दिली क्राइम ब्रांच न देखील तितक्याच तीव्रतेने कारवाई करत रेणूला इंदौर मधून अटक केली लवकरच रेणू शर्मा ला किल्ला कोर्टामध्ये हजर केलं गेलं. या प्रकरणातील पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी होणार आहे.

रेणू शर्मा ही परदेशातील नंबर वापरून मेसेज आणि व्हाट्सअप तसेच फोन करून पैशाची मागणी करत होती असं धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

'पिछले साल एक कागज सोशल मीडिया पर डाला तो तुम्हारा मंत्री पद जानेकीं नौबत आ गई थी। अब अगर मेरी मांग पूरी नहीं की तो बदनाम कर दुँगी। अगर मंत्री पद बचाना चाहते हो, तो दस करोड कौनसी बडी बात है?' अशा आशयाचे मेसेज सदर महिला पाठवत असून, याद्वारे 5 कोटी रुपये कॅश व 5 कोटी रुपयांचे दुकान विकत घेऊन देण्याची मागणी रेणू शर्माने केली असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

सदर रेणू शर्मा ही महिला मूळ इंदौर मध्य प्रदेशातील असून ती करुणा शर्माची बहीण आहे, मुंडे यांच्या तक्रारीनंतर मुंबई क्राईम ब्रँच व इंदौर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला अटक करून आधी (दि. 20) इंदौर कोर्टात हजर केले होते, इंदोर कोर्टाने तिला रिमांड दिला आणि त्यानंतर आज (दि. 21) रोजी सदर महिलेला पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सदर रेणु शर्मावर इतर अनेक व्यक्तींनीही ब्लॅकमेलिंग संदर्भातल्या तक्रारी यापुर्वी अनेकदा विविध पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत.

Updated : 21 April 2022 9:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top