Latest News
Home > News > करिनाने हा सिनेमा नाकारला...काय आहे त्याच कारण?

करिनाने हा सिनेमा नाकारला...काय आहे त्याच कारण?

करन जोहरच्या आगामी चित्रपटात शाहरुख खान एवढीच रक्कम मला मिळाली तरच मी हा सिनेमा करेन अशी भूमिका घेत करीन कपूरने करण जोहरला नाकारले आहे.

करिनाने हा सिनेमा नाकारला...काय आहे त्याच कारण?
X

करण जोहर यांच्या आगामी चित्रपटात शाहरुख खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. पण अभिनेत्री कोण असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. करीन कपूर यात अभिनेत्री म्हणून दिसणार अस म्हंटल जात असेल तरी खरी गोष्ट अशी की, गेल्या काही दिवसांपासून करीन कपूर व करण जोहर या दोघांमध्ये खटके उडल्यामुळे ते एकमवकांशी बोलत नाहीत. याच कारण आहे सिनेमात मिळणारे पैसे.

शाहरुख खान याला जेवढी मोठी रक्कम या सिनेमासाठी दिली आहे तेवढीच रक्कम मला द्या तरच मी हा सिनेमा कारेन. अन्यथा मी हा सिनेमा करणार नाही. करिनाने अस म्हंटल्यामुळे आता करणं जोहर करिणाला एवढी रक्कम देतो का? तिच्यासोबत हा सिनेमा करतो की नाही? पाहावं लागणार आहे.

बॉलिवूड मध्ये समान वेतन मिळत नाही अशी वारंवार चर्चा होते.त्यासंबंधी अनेकवेळा बातम्या देखील येतात मात्र आता या विरोधात करीन कपूरने ठोस भूमिका घेत थेट सिनेमाची ऑफर धुडकावून लावली आहे. करीन कपूर म्हणते की, फक्त बॉलिवूड मध्येच नाही तर सर्वच ठिकाणी महिलांना दुजाभाव दिला जातो. त्यामुळे खांद्याला खांदा लावून जेवढी रक्कम पुरुषाला मिळते तेवढी एक स्त्रीला सुद्धा दिली पाहिजे. करिनाने घेतलेल्या या भूमिकेचे समाजमाध्यमांवर काही लोक त्यांना ट्रोल करतायत तर काही त्यांचं कौतुक देखील करत आहेत.

Updated : 11 Aug 2021 3:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top