Home > News > कंगनाच्या ट्विटर अकांउटला अखेर कुलूप, बाकीच्यांचं काय?

कंगनाच्या ट्विटर अकांउटला अखेर कुलूप, बाकीच्यांचं काय?

कंगनाच्या ट्विटर अकांउटला अखेर कुलूप, बाकीच्यांचं काय?
X

आपल्या वादग्रस्त ट्वीटने कायम चर्चेत राहणाऱ्या कंगना राणावतचं ट्वीटर अकाउंट ट्विटरने काही काळासाठी निलंबीत केलं आहे. मात्र, भाजप समर्थक असो अथवा इतर पक्षातील वाचाळवीर अशा पद्धतीने ट्वीटर व्यक्त होतात. त्यांनी केलेल्या ट्वीटमुळे समाजामध्ये अनेकवेळा तेढ निर्माण होते. असे अनेक लोक अजुनही ट्वीटरवर आहेत. अशा लोकांचे अकाउंट देखील ट्विटर का निलंबीत करत नाही. असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्याव कंकनाचं ट्वीटर अकाउंट निलंबीत झाल्यानं आता तरी कंगना योग्य भाषेत व्यक्त होईल. असं बोललं जात आहे.

काय आहे प्रकरण?

पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केलेल्या टीकेनंतर कंगना राणावतचं ट्विटर अकांउट ब्लॉक करण्यात आलं आहे. कंगना ने ममता बॅनर्जी यांच्यासंदर्भात असंसदीय शब्दाचा वापर केला होता. त्यानंतर कंगनावर मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली होती.

भाजपचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाल्यानंतर कंकना ने तृणमूल कॉंग्रेस चे लोक महिलांना मारत असल्याचा दावा केला होता. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2000 सालचं विराट रुप धारण करुन ममताला आटोक्यात आणण्याचा आग्रह करत होती. तिच्या या ट्वीटनंतर मोठा बवाल झाला आणि तिचं अकांउट सस्पेंड करण्यात आलं आहे.

Updated : 2021-05-04T15:45:54+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top