Home > News > कंगना का पंगा, मेहनत रंग लाई

कंगना का पंगा, मेहनत रंग लाई

67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या यादीत कंगना सर्वोकृष्ठ अभिनेत्री

कंगना का पंगा, मेहनत रंग लाई
X

राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्या जाणाऱ्या 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांच्या नावाची यादी केंद्रीय महिती आणि प्रसारण मंत्रालयाने जाहिर केली आहे. भारतीय चित्रपट सृष्टीत मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार सोहळा कोरोनामुळे एक वर्ष विश्रांती नंतर होणार आहे.

या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या कलाकारांमध्ये कंगना रणौतला पंगा, मणिकर्णिका या दोन चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्याने कंगना चांगलीच चर्चेत आली आहे.

विजेत्यांची यादी खालील प्रमाणे –

बेस्ट इन्वेस्टीगेटीव्ह - जक्कल

सामाजिक हक्कांवर आधारित चित्रपट- होली राईट्स (हिंदी), लाडली (हिंदी)

सर्वोत्कृष्ट पर्यावरण विषयक चित्रपट- द स्टॉर्क सेवियर्स

सर्वोत्कृष्ट अभिनेता (विभागून) - मनोज बाजपेयी (भोसले), धनुष (असूरन)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - कंगना राणौत (पंगा, मणिकर्णिका)

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- छिछोरे

सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती) - सोहिनी चट्टोपाध्याय

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - बी. प्राक (तेरी मिट्टी- केसरी)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - सावनी रविंद्र (रान पेटलं - Bardo)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - पल्लवी जोशी (द ताश्कंद फाईल्स)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - विजय सेतुपती (सुपर डिलक्स)

Updated : 22 March 2021 12:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top