Home > News > 'आता पद्मश्री पुरस्कार परत कर' नेटकऱ्यांच्या मागणीला कंगनाचं प्रत्युत्तर

'आता पद्मश्री पुरस्कार परत कर' नेटकऱ्यांच्या मागणीला कंगनाचं प्रत्युत्तर

आता पद्मश्री पुरस्कार परत कर नेटकऱ्यांच्या मागणीला कंगनाचं प्रत्युत्तर
X

Courtesy: Social Media

"आता तर सीबीआय आणि एम्स दोघांनीही असा निष्कर्ष काढला आहे की सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला आहे. काही लोक सरकारने दिलेले पुरस्कार परत करण्याविषयी बोलले होते? कुठे आहेत ते आता?" अशा आशयाचं ट्वीट करुन अभिनेत्री स्वरा भास्करने कंगनाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

एम्सच्या डॉक्टरांनी सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली हा दावा फेटाळला आहे. त्यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला आहे असं एम्सच्या डॉक्टरांनी त्यांच्या अहवालामध्ये नमुद केलं. सुशांत सिंह राजपुत आत्महत्या केल्याचे सिध्द झाले. याप्रकरणावरून अभिनेत्री स्वरा भास्करने कंगना राणावत वर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

यावरुन अभिनेत्री कंगना राणावतला सोशल मीडियावर #KangangAwardWapaskar हा हॅशटॅक वापरून ट्रोल करण्यात आलं.

दरम्यान, कंगनाने ट्रोलर्सना उत्तर दिलं असून तीने #KanganaAwardWapasKar या ट्रेन्डसोबत एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीची लिंक शेअर केली आहे. "ही माझी मुलाखत आहे. जर तुमची स्मृती कमजोर असेल तर पुन्हा पाहा, मी एखादा खोटा किंवा चुकीचा आरोप केला असेल तर मी माझे सर्व पुरस्कार परत करेन, हे क्षत्रियाचे वचन आहे, मी रामाची भक्त आहे. जीव गेला तरी चालेल पण वचन मोडणार नाही." असे उत्तर कंगनाने दिले आहे.


Updated : 8 Oct 2020 11:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top