Home > News > महात्मा गांधींच्या स्मृतीदिनीच, कंगनानं केलं नथुराम गोडसेचं संमर्थन!

महात्मा गांधींच्या स्मृतीदिनीच, कंगनानं केलं नथुराम गोडसेचं संमर्थन!

महात्मा गांधींच्या स्मृतीदिनीच, कंगनानं केलं नथुराम गोडसेचं संमर्थन!
X

बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत गेल्या काही काळापासून वारंवार चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. ट्विटरवर कोणतं ना कोणतं वादग्रस्त ट्विट करून ती चर्चेत राहाताना दिसत आहे. कंगना आताही तिच्या ट्विटमुळे चर्चेत आली आहे. ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त कंगनाने नथुराम गोडसे बद्दल एक ट्विट केलं होतं, जे सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यानंतर सोशल मिडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

कंगनानं या ट्विटमध्ये गोडसेची व्यक्तिरेखा चांगल्या प्रकारे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या ट्विटनंतर ट्विटर युजर्स दोन गटात विभागलेले पाहायला मिळाले. कंगना आणि तिच्या भूमिकेवर अनेकांनी टीका केली तर बरेच लोक तिच्या विचारांचे समर्थन करताना दिसत होते.

काय होतं कंगनाचं ट्विट :

या ट्विटमध्ये कंगना रनौत यांनी नथुराम गोडसेचे छायाचित्रे शेअर केली आहेत. हे फोटो शेअर करताना कंगनाने लिहलंय की, "प्रत्येक कथेचे तीन पैलू असतात, एक आपला आहे, एक माझा आणि एक सत्य आहे.. चांगला कथाकार हा कोणाला बांधील नसतो किंवा तो काही लपवतही नाही.. त्यामुळे आपली पुस्तके पूर्णपणे दिखावा करणारी आणि निरुपयोगी आहेत"

कंगनानं मुद्दाम महात्मा गांधी यांच्या स्मृतीदिनी नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ ट्विट करत खोडसाळ पणाच केला आहे. त्यामुळे सोशल मिडियावर अनेक प्रकारच्या चर्चा रंगल्या आहेत. कंगना ही मानसिक रित्या आजारी असल्याचं अनेक ट्विटर युझर्सनी कंगनाच्या या ट्विटवर कंगनाला प्रत्युत्तर देताना म्हंटलं आहे.

Updated : 31 Jan 2021 11:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top