Home > News > आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटावर कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया; म्हणाली...

आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटावर कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया; म्हणाली...

आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटावर कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया; म्हणाली...
X

नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत ( Kangana Ranaut ) हिने बॉलिवूड अभिनेता आमिर खान ( Amir Khan ) आणि किरण राव ( Kiran Rao )यांच्या घटस्फोटावर वक्तव्य केलं आहे. यावेळी तिने, 'एखाद्या मुस्लिम व्यक्तीशी लग्न झाल्यानंतर आपल्याला धर्म का बदलावा लागतो?, असा प्रश्न उपस्थितीत केला आहे.

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने म्हंटल आहे की, "एक काळ असा होता जेव्हा पंजाबमधील कुटुंबांमध्ये एका मुलाला हिंदू तर दुसऱ्या मुलाला शीख धर्माचे पालन करावे लागायचे. तशी परंपरा होती. परंतु अशी परंपरा हिंदू आणि मुस्लिम, मुस्लिम आणि शीख समाजामध्ये नाही," असं कंगना म्हणाली.

पुढे बोलताना ती म्हणते की, "आमिर खान सरांनी घटस्फोट घेतल्याचे मला आश्चर्य वाटले. त्यानंतर असा विचार मनात आला की, हिंदू आणि मुस्लीम आंतरधर्मिय लग्नातून जन्माला आलेली मुलं नेहमीच मुस्लिम का होतात. महिला हिंदू धर्माचे पालन का करू शकत नाही. काळानुसार आपल्याला या गोष्टीही बदलायला हव्यात. ही एक जुनी प्रथा आहे. जर एखाद्या कुटुंबामध्ये हिंदू, जैन, बौद्ध, शीख आणि नास्तिक एकत्र राहू शकतात तर मग मुस्लिम का नाही राहू शकत? एखाद्या मुस्लिम व्यक्तीशी लग्न झाल्यानंतर आपल्याला धर्म का बदलावा लागतो?",असे कंगना म्हणाली आहे.
कंगनाने केलेली ही पोस्ट सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. तर ट्विटरवर सुद्धा अनेक जण कंगनाच्या इन्स्टाग्राम पोस्टचे स्कीन शॉट पोस्ट करताना पाहायला मिळत आहे.

Updated : 6 July 2021 6:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top