Home > News > नुपुर शर्मावर होत असलेली टीका कंगना रनौतल झोंबली…

नुपुर शर्मावर होत असलेली टीका कंगना रनौतल झोंबली…

नुपुर शर्मावर होत असलेली टीका कंगना रनौतल झोंबली…
X

भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी लाईव्ह चर्चेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं यामुळे झालेल्या वादंगांमुळे भाजपने नुपूर शर्माला निलंबित केलं पण आता नुपूर शर्मा प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतावर टीका होत आहे. याच प्रकरणामुळे आता अल कायदा या दहशतवादी संघटनेने सुद्धा भारतामध्ये आत्मघाती हल्ले करणार असल्याची धमकी दिली आहे. या वादग्रस्त वक्तव्यामुळे अगदी स्थानिक पातळीवरून आंतरराष्ट्रीय पातळीवर नुपूर शर्मा यांच्यावर टीका होत आहे.

नुपुर शर्मा प्रकरणामुळे इतकं सारं होत असताना बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, प्रत्येक दिवशी हिंदु देवतांना अपमानित केले जाते त्या वेळी आपण न्यायालयात न्याय मागतो. पण आता नुपूर शर्मा यांना ज्या प्रकारे धमक्या दिल्या जात आहेत हे सर्व मी पाहिले आहे. किमान आता तरी असं करू नका हे काही अफगानिस्तान नाही. नुपूर शर्मा यांना त्यांचं म्हणणं मांडण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. आपल्या देशात लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे आणि यालाच लोकशाही असं म्हणतात. हे सर्व मी जे लोक नेहमी विसरतात त्यांना फक्त आठवण करून देण्यासाठी सांगत आहे. असं कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत म्हंटल आहे.

हे ही वाचा..

नुपूर शर्मा प्रकरणः अल कायदाची भारतावर हल्ले करण्याची धमकी…

नुपूर शर्मा प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतावर टीका होत असताना आता

अल कायदा या दहशतवादी संघटनेने भारतामध्ये आत्मघाती हल्ले करणार असल्याची धमकी दिली आहे.

गुजरात, उत्तर प्रदेश, मुंबई आणि दिल्लीमध्ये हे आत्मघाती हल्ले करणार असल्याची अधिकृत धमकी अल-कायदा दहशतवादी संघटनेने दिली आहे.

टीव्हीवरील डिबेट शो दरम्यान भाजप नेत्या नूपुर शर्मा यांनी पैगंबर यांच्या बाबत अपशब्दांचा वापर केला होता. या वक्तव्यामुळे च अल कायदाने ही धमकी दिली आहे. त्यांनी त्यांच्या मेसेज मध्ये या डिबेट शोचा उल्लेखही केला आहे.

अल कायदाने या धमकीत,

पैगंबरांच्या अपमानाचा बदला आम्ही घेऊ. आम्ही आणखी लोकांनाही या लढाईत सामील होण्यास सांगू. आम्ही त्या लोकांना मारून टाकू जे पैगंबर मोहम्मद यांचा अपमान करतील. आम्ही आमच्या तसेच आमच्या मुलांच्या शरीरामध्ये विस्फोटक बांधू जेणेकरून अशा लोकांना उडवलं जाऊ शकेल.

पैगंबर मोहम्मद यांच्या अपराध्यांना आम्ही माफ नाही करणार. दिल्ली-मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरात मधील भगव्या कार्यकर्त्यांना संपवणार. ते त्यांच्या घरात लपूही शकणार नाहीत आणि सुरक्षा दलही त्यांना वाचवू शकणार नाहीत.

असं या धमकीत म्हटलं आहे.

नुपूर शर्मा यांना दिल्ली पोलिसांची सुरक्षा

पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा जोर धरत आहे. या प्रकरणात नुपूर शर्माला धमक्या आल्याचा आरोप तिने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्माला सुरक्षा पुरवली आहे.

Updated : 8 Jun 2022 5:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top