Latest News
Home > News > "उद्धव ठाकरे यांनी मुसलमानांसोबत जाऊन पक्ष बनवला..त्यांनी..." कांचन गिरी यांचा घणाघात

"उद्धव ठाकरे यांनी मुसलमानांसोबत जाऊन पक्ष बनवला..त्यांनी..." कांचन गिरी यांचा घणाघात

उद्धव ठाकरे यांनी मुसलमानांसोबत जाऊन पक्ष बनवला..त्यांनी... कांचन गिरी यांचा घणाघात
X

कांचन गिरी यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. यांनी माध्यमांशी बोलताना हिंदु राष्ट्राच्या बांधणीसाठी मी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना "बाळासाहेब ठाकरे यांची छबी राज ठाकरे यांच्यामध्ये दिसते. राज ठाकरे यांच्या मनात उत्तर भारतीय लोकांबाबत जो पूर्वग्रह झाला आहे तो मी दूर करेन. ते तितके समजूतदार आहेत अस म्हणत त्यांनी राज ठाकरे यांची स्थुती केली. त्यांनी आज मुंबई मध्ये त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यात हिंदुत्वाच्या मुद्यावर चर्चा झाली. त्यांनी हिंदुराष्ट्राच्या मजबुत बांधणीसाठी ही भेट घेतली आल्याचे त्या म्हणाल्या.

तर याचवेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, उद्धव ठाकरे यांनी मुसलमानांसोबत जाऊन पक्ष बनवला. त्यासाठी मी नाराज आहे. पालघरमध्ये जे हत्याकांड झाले तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपले डोळे व कान दोन्ही बंद केले होते. उद्धव ठाकरे यांच्यावर मला काही बोलायचे नाही. कारण त्यांनी आपले वडील बाळासाहेब ठाकरे यांचे नाव बुडवले आहे. अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

Updated : 17 Oct 2021 10:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top