Home > News > कमला हॅरिस यांच्या फॅशनची जोरदार चर्चा, शपथ विधीला काय पोशाख करणार याकडे सर्वांचं लक्ष!

कमला हॅरिस यांच्या फॅशनची जोरदार चर्चा, शपथ विधीला काय पोशाख करणार याकडे सर्वांचं लक्ष!

अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष आणि भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या पोशाखाची जगभरात सध्या जोरदार चर्चा आहे.

कमला हॅरिस यांच्या फॅशनची जोरदार चर्चा, शपथ विधीला काय पोशाख करणार याकडे सर्वांचं लक्ष!
X

डेमोक्रेटिक पक्षाचा प्रचार करत असताना कमला हॅरिस यांनी त्यांच्या विविध कार्यक्रमात परिधान केलेल्या पोशाखाची जगभरात चर्चा झाली. त्यांची पोशाखाची निवड ही कायम त्यांच्यावर उठून दिसणारी आणि लोकांवर प्रभाव पाडणारी असते. प्रत्येक भाषणावेळी त्या अगदी त्यांचा सुट त्याला साजेसं शर्ट आणि स्कर्ट घालून आत्मविश्वासाने लोकांसमोर उभ्या राहात होत्या.

त्यांच्या पोशाखामुळेही अमेरिकेतील लोकांना त्यांच्यात एक आत्मविश्वास असणाऱ्या नेत्या वाटतात. सध्या त्या अमेरिकेच्या उपाध्यक्ष पदाची शपथ घेताना काय पोशाख परिधान करणार याची उत्सुकता लागली आहे. अनेकांनी कमला यांनी त्यांच्या अनेक भाषणांमध्ये भारताचा उल्लेख केल्यामुळे त्या अमेरिकेच्या उपाध्यक्ष पदाची शपथ घेताना साडी नेसतील अशी शक्यता वर्तवली आहे.

अमेरिकेसाठी आणि भारतासाठी कमला हॅरिस यांच्या शपथ विधीचा क्षण ऐतिहासिक असणार आहे. त्यामुळे त्यांच्या पोशाखाबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.Updated : 20 Jan 2021 1:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top