Home > News > पत्नीनेच लावले पतीचे प्रियसीसोबत लग्न,तिघेही राहतात एकाच घरी

पत्नीनेच लावले पतीचे प्रियसीसोबत लग्न,तिघेही राहतात एकाच घरी

पत्नीनेच लावले पतीचे प्रियसीसोबत लग्न,तिघेही राहतात एकाच घरी
X

सोशल मीडियावर आपल्या व्हिडीओद्वारे अधिराज्य गाजवणाऱ्या एका तरुणाचा आज एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आपण चित्रपटाच्या पडद्यावर प्रेम त्रिकुटाच्या कथा पाहिल्या असतील, परंतु तिरुपतीमधील पती, पत्नी आणि तिचे अनोखे प्रकरण सध्या गाजत आहे.या घटनेचा शेवट त्यांच्या आयुष्याची सुरुवात आहे त्यामुळे हे प्रकरण सुद्धा चर्चेत आहे. तिरुपती येथे राहणारा कल्याण नावाचा तरुण यूट्यूबवर खूप लोकप्रिय आहे.सोशल मीडियावरील व्हिडीओजमुळे यूट्यूबवर प्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी त्याची विमला नावाच्या मुलीशी भेट झाली आणि त्यानंतर दोघेही प्रेमात पडले आणि लग्न झाले. कल्याणने पुन्हा यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्यास सुरुवात केली.

यापूर्वी कल्याणची ओळख विशाखापट्टणम येथील नित्या नावाच्या मुलीशी झाली होती. नित्या व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोडही करायची. मात्र, काही काळानंतर कल्याण आणि नित्याचे नाते तुटले आणि कल्याणने पुन्हा विमलासोबत लग्न केले. मात्र, जेव्हा नित्याला कल्याणच्या विमलासोबतच्या लग्नाची बातमी कळते तेव्हा ती विमलापर्यंत पोहोचते. ती विमलाचा ​​हात हातात घेते आणि कल्याणशी लग्न करण्यासाठी विमलाची संमती मागते आणि आपण तिघेही एकाच घरात राहू ,असा प्रस्तावही ठेवते .

विमला नित्याच्या प्रस्तावाला होकार देते.विमलाने नित्याचे लग्न पती कल्याणशी मंदिरात करून दिले आणि तिघांनी फोटोही काढले. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. घरातील कामांसोबतच नित्या आता कल्याणच्या यूट्यूबवरही मदत करते.पहिली पत्नी विमला हिने स्वत: नवऱ्याचे त्याच्या लग्नाआधीच्या प्रेयसीसोबत लग्न करण्याची सर्व व्यवस्था केली. आजच्या युगात सोशल मीडियावर ही बातमी लोकांमध्ये रंजक बातम्यांचा विषय बनून राहिली आहे. अशा चित्रपटांमध्ये पाहिलेली कथा खऱ्या प्रेमकथेबद्दल ऐकून आश्चर्यचकित होते.

Updated : 2022-09-26T17:23:11+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top