Home > News > रक्षकच बनला भक्षक, पोलिस निरिक्षकाचा तरुणीवर बलात्कार...

रक्षकच बनला भक्षक, पोलिस निरिक्षकाचा तरुणीवर बलात्कार...

रक्षकच बनला भक्षक, पोलिस निरिक्षकाचा तरुणीवर बलात्कार...
X

एमपीएससी आणि यूपीएससी स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी मोठी मदत करेन. असं सांगत बंगल्यावर घेऊन वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी कडेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विपीन हसबनिस यांच्यावर कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडित मुलीने 28 वर्ष कडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कडेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हसबनिस यांनी पीडित मुलीस कासेगाव बस स्थानकाजवळ कोठे जाणार आहे. लॉकडाऊन असल्याने तुम्हाला वाहन मिळणार नाही, तुम्हाला मी कराडला सोडतो. असं सांगून ओळख करून घेतली. त्यानंतर गाडीतून कासेगावहून कराडकडे जात असताना संबंधित तरुणीचा मोबाईल नंबर घेतला. माझी पत्नी एमपीएससी आणि यूपीएससी स्पर्धा परीक्षेची मार्गदर्शक असून ती तुम्हाला मार्गदर्शन करेल असे सांगून कडेगाव येथील बंगल्यावर बोलवून घेतले व वारंवार बलात्कार केला.

या बलात्काराबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास आत्महत्या करेन. अशी धमकीही पोलिस निरीक्षक हसबनिस यांनी दिली. याबाबत पीडित मुलीने कडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

Updated : 28 Aug 2020 8:34 PM IST
Next Story
Share it
Top