जेनिफरचा लढा: 'तारक मेहता' निर्माता असित मोदी यांना दंड!
X
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील मिसेस रोशन सिंग सोधी, अभिनेत्री जेनिफर मिस्त्री Jennifer Mistry यांनी 'तारक मेहता' निर्माता असित कुमार मोदी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता.
अनेक दिवसांच्या लढ्यानंतर, न्यायालयाने जेनिफरच्या बाजूने निर्णय दिला आणि असित मोदी यांना थकीत रकमेसह अभिनेत्रीला 5 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले.
जेनिफर यांनी नुसतेच असित मोदी यांच्यावरच नव्हे तर कार्यकारी निर्माते जतिन बजाज आणि ऑपरेशन हेड सोहेल रमाणी यांच्या विरोधातही तक्रार दाखल केली होती.
पवई पोलिसांनी असित मोदी यांच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 354 आणि 509 अंतर्गत एफआयआर नोंदवला होता.
अनेक दिवसांपासून न्यायासाठी लढा देत असताना, जेनिफर यांना मुंबई पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे मदत मागितली आणि न्यायालयातून त्यांना दिलासा मिळाला.
असित मोदी यांना दंड ठोठावून न्यायालयाने जेनिफर यांच्या लैंगिक छळाच्या आरोपांना दुजोरा दिला.