Home > News > क्वॉरंटाइन कालावधी संपल्याने भारताच्या महिला संघाचा आनंद गगनात मावना

क्वॉरंटाइन कालावधी संपल्याने भारताच्या महिला संघाचा आनंद गगनात मावना

क्वारंटाईन कालावधी संपताच महिला क्रिकेटपटूंनी भन्नाट डान्स केला असल्याचे पाहायला मिळाले आहे.

क्वॉरंटाइन कालावधी संपल्याने भारताच्या महिला संघाचा आनंद गगनात मावना
X

IPL 2020 स्पर्धा युएईमध्ये सुरू आहे. भारतात असलेला करोनाचा धोका लक्षात घेता ही स्पर्धा देशाबाहेर भरवण्यात आली आहे. त्यामुळे महिलांचे IPL देखील यंदा युएईमध्येच खेळवण्यात येणार आहे. Women's T20 Challenge असं या स्पर्धेचं हे नाव असून याच्या तारखा रविवारी जाहीर करण्यात आल्या. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय महिला क्रिकेटपटू काही दिवसांपूर्वी दुबईला रवाना झाल्या. त्यानंतर बीसीसीआयने ठरवून दिलेल्या नियमानुसार सामन्यापूर्वी संघ क्वारंटाईन झाला होता. क्वारंटाईन कालावधी संपताच महिला क्रिकेटपटूंनी भन्नाट डान्स केला असल्याचे पाहायला मिळाले आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने काही नियम आखून दिले आहेत. सामन्यापूर्वी प्रत्येक खेळाडूला १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार. तसेच ती कोरोनाच्या तीन चाचण्यांना सामोरे जावे लागणार. याच नियमांचे पालन करत महिला क्रिकेटपटू दुबईला रवाना झाल्या. तिथे गेल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर End of quarantine! म्हणत महिला क्रिकेटपटूंनी भन्नाट डान्स केला. हा व्हिडिओ मुंबईकर जेमायमा रॉड्रीग्जने शूट करत केला आणि मराठमोळ्या स्मृती मंधानाने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला आहे.



Updated : 29 Oct 2020 7:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top