Home > News > जायकवाडी धरणातून होणार विसर्ग वाढवला; पुन्हा 27 दरवाजे उघडले

जायकवाडी धरणातून होणार विसर्ग वाढवला; पुन्हा 27 दरवाजे उघडले

जायकवाडी धरणातून होणार विसर्ग वाढवला; पुन्हा 27 दरवाजे उघडले
X

रात्रीपासून जायकवाडी धरण ( jayakwadi dam ) परिसरात सुरु असलेल्या पावसामुळे शनिवारी सकाळी धरणातून होणार विसर्ग पुन्हा वाढवण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 7 वाजता पूर्ण 27 दरवाजे उघडण्यात आले आहे.

जायकवाडी धरणातून सद्या गोदावरी नदी पात्रात 89 हजार 604 क्युसेक विसर्ग सुरू सुरु आहे. गेट क्रमांक 10 ते 27 हे 4 फुट उंचीने उघडण्यात आले आहे. तर, गेट क्रमांक 1 ते 9 असे एकुण 9 आपात्कालीन गेट 1.5 फुट उंचीने उघडण्यात आले आहे.

Updated : 2 Oct 2021 2:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top