Home > News > आरोपीच्या पत्नीची ११ तास चौकशी..

आरोपीच्या पत्नीची ११ तास चौकशी..

आरोपीच्या पत्नीची ११ तास चौकशी..
X

जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट ट्रेनमध्ये 31 जुलै रोजी गोळीबार झाला होता आणि या घटनेनंतर संपूर्ण देश हादरून गेला. रेल्वे पोलीस फोर्सचा जवान असलेल्या चेतन सिंहने केलेल्या या गोळीबारामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर हा जावं मानसिक रोगी असल्याचं सांगितले जाऊ लागले. आता या प्रकरणामध्ये मुंबई जीआरपीने शनिवारी आरोपी चेतन सिंहची पत्नी रेणू सिंहची चौकशी केली. तब्बल 11 तास रेणू सिंहची चौकशी करण्यात आली. रेणू सिंहने जीआरपी पोलिसांनी मुंबईत बोलावलं होतं. चौकशी संपल्यानंतर रेणूने दिलेल्या जबाबाची लेखी नोंद करण्यात आली आहे. बोरीवली येथील जीआरपीच्या कार्यालयामध्ये काल शनिवारी सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत रेणूची चौकशी करण्यात आली.

Updated : 6 Aug 2023 6:34 AM GMT
Next Story
Share it
Top