Home > News > 'मुलगी झाली हो' विराट कोहलीनं ट्विट करून दिली गोड बातमी!

'मुलगी झाली हो' विराट कोहलीनं ट्विट करून दिली गोड बातमी!

मुलगी झाली हो विराट कोहलीनं ट्विट करून दिली गोड बातमी!
X

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन झालंय. विराट कोहलीनं स्वत: सोशल मीडियावर याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री यांना कन्यारत्न प्राप्त झाली आहे. विराटनं सोशल मीडियावर स्वतः याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे. विराट कोहलीनं ११ डिसेंबर २०१७ रोजी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत त्याच्या प्रेमसंबंधांच्या अनेक चर्चांना पूर्ण विराम देत इटली येथे डेस्टिनेशन वेडिंग केली होती.

विराट आणि अनुष्काच्या लग्नानंतर ४ वर्षांनी त्यांना आई-बाबा होण्याचं सुख प्राप्त झालं आहे. विराटनं सोशल मीडियावर लिहीलेल्या पोस्टमध्ये लिहलं आहे की, 'आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की, आज दुपारी आम्हाला मुलगी झाली. आम्ही आपल्या प्रेमाबद्दल मनापासून आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी दोघीही ठीक आहेत. आमचं सौभाग्य आहे की जीवनाचा हा चॅप्टर आम्हाला अनुभवता आला. आता आम्हाला थोड्या प्रायव्हसीची गरज आहे'

विराटनं ही पोस्ट केल्यानंतर विराट आणि अनुष्का या दोघांच्या चाहत्यांमध्ये कमालीचा आनंद आहे. विराटनं ही बातमी कळवताच त्याच्यावर आणि अनुष्कावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मॅक्स वूमनकडूनही विराट आणि अनुष्काला त्यांच्या घरी कन्येचा जन्म झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा!

Updated : 11 Jan 2021 12:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top