Home > News > CRIME | Ai कंपनीची CEO असलेल्या महिलेनेच केला पोटच्या मुलाचा खून

CRIME | Ai कंपनीची CEO असलेल्या महिलेनेच केला पोटच्या मुलाचा खून

CRIME |  Ai कंपनीची CEO असलेल्या महिलेनेच केला पोटच्या मुलाचा खून
X

एका AI कंपनीची CEO असलेल्या महिलेने आपल्या पोटच्या मुलाचा खून केल्याची घटना गोव्यामध्ये घडली आहे. सूचना सेठ असं या महिलेचं नाव असून बंगलुरू मध्ये ती एका AI कंपनीची CEO आहे. घटस्फोटानंतर आपल्या मुलाची व पतीची भेट होऊ नये म्हणून या महिलेने आपल्या ४ वर्ष्याच्या मुलाची हत्या केल्याची कबुली तिने दिली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

२०१० साली सूचना सेठ हिचा विवाह व्यंकटरमन याच्याशी झाला. २०१९ ला या जोडप्याने मुलाला जन्म दिला. पण गेल्या अनेक दिवसापासून या दोघांची सतत भांडणं होत होती. त्या दोघांनी न्यायालयात तसा अर्ज केला .काही काळाने व्यंकारमन यांनी मुलाला दर रविवारी भेटण्याची परवानगी मागितली.न्यायालयाने त्यांना तशी परवानगी दिली. रविवार दि.८ जानेवारी रोजी बाप मुलाची भेट होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या पोटच्या मुलाची हत्या केली.
कशी केली हत्या?

सूचना सेठ हिने ६ जानेवारी रोजीच गोव्याच्या कांडोलिम येथील हॉटेल मध्ये चेकइन केलं.न्यायालयाने दिलेल्या परवानगी नुसार ८ जानेवारी रोजी व्यंकटरमन यांचा मुलाला भेटण्याचा वार होता. ७ तारखेला व्यंकटरमन यांनी मुलाला बोलण्यासाठी व्हिडिओ कॉल केला पण सूचना सेठ हीच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. सोमवारी सुचना हिने हॉटेल मधून चेकआऊट केलं.त्यांनी हॉटेल स्टाफला गोवा to बेंगलोर पर्यंत टॅक्सी बुक करायला सांगितली. चेकआऊट करताना त्या एकट्याच जात असल्याचं हॉटेल स्टाफ दिसलं . हॉटेल स्टाफने मुलाबद्दल विचारले असता मुलगा आपल्या मित्राकडे राहिला असल्याचं सांगितलं. नंतर रूम साफ करण्यासाठी हॉटेल कर्मचारी तिच्या रूममध्ये गेले असता रूममध्ये त्यांना रक्ताचे डाग दिसले. हॉटेल मध्ये आपल्या मुलासोबत आलेली सूचना ही एकटीच गेली आणि रक्ताचे डाग पाहिल्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी लगेच पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी लगेच टॅक्सी चालकाशी संपर्क साधला .पोलिसांनी मुलाची तिच्याशी चौकशी केली असता तिने पोलिसांनाहि मुलगा मित्राकडे असल्याची माहिती दिली.

कशी झाली अटक

सूचना हि खोटी माहिती देत देतिय हे पोलिसांच्या लक्षात आलं.पोलिसांनी ड्राइव्हरशी कोकणी भाषेत संवाद साधला व ड्रायव्हरला टॅक्सी बेंगलोर मधल्या एका

पोलीस स्टेशनमध्ये नेण्याची सूचना केली. टॅक्सी हि बंगलोरस्थित पोलीस स्टेशन मध्ये पोहताच तेथील पोलिसांनी टॅक्सीची तपासणी केली असता बॅगमध्ये मुलाचा मृतदेह आढळून आला. लागलीच पोलिसांनी सूचना सेठ हिला अटक केली.सध्या न्यायालयाने सूचना हिला ६ दिवसाच्या रिमांड वर पाठवलं आहे.

Updated : 11 Jan 2024 10:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top