Home > News > ममता बॅनर्जींचं मुख्यमंत्रीपदी कायम राहणार की...; भोवानीपूर पोटनिवडणुकीचा आज निकाल

ममता बॅनर्जींचं मुख्यमंत्रीपदी कायम राहणार की...; भोवानीपूर पोटनिवडणुकीचा आज निकाल

ममता बॅनर्जींचं मुख्यमंत्रीपदी कायम राहणार की...; भोवानीपूर पोटनिवडणुकीचा आज  निकाल
X

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. पश्चिम बंगालची कमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हातात राहिल की नाही याचा निर्णय आज होणार आहे. आज भवानीपूर जागे ( Bhabanipur By-Poll Result 2021 ) वरझालेच्या मतदानाची मतमोजणी आहे.

भवानीपूर व्यतिरिक्त, शमशेरगंज आणि जंगीपूर विधानसभा जागांसाठी झालेल्या मतदानाच्या पोटनिवडणुकीचे निकाल देखील आज लागतील. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः भवानीपूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपच्या उमेदवार प्रियांका टिबरेवाल (BJP Priyanka Tibrewal) यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली आहे.

तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष-मार्क्सवादी (CPI-M) ने श्रीजीब बिस्वास यांना तिकीट देण्यात आलं आहे. तर निवडणूक आयोगाच्या मते, भवानीपूरमध्ये 53.32 टक्के मतदान झाले आहे. तर मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जंगीपूर येथे 76.12 टक्के, आणि शमशेरगंजमध्ये 78.60 टक्के मतदान झाले. सर्वात कमी मतदान भवानीपूरमध्ये झालं आहे. आजच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Updated : 3 Oct 2021 4:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top