Home > News > कोविड सर्वेक्षण कामकाजात आता अंगणवाडी सेविकांचा समावेश नाही, सरकारचा निर्णय

कोविड सर्वेक्षण कामकाजात आता अंगणवाडी सेविकांचा समावेश नाही, सरकारचा निर्णय

कोविड सर्वेक्षण कामकाजात आता अंगणवाडी सेविकांचा समावेश नाही, सरकारचा निर्णय
X

अंगणवाडी सेविकांना कोविड-१९ विषाणू सर्वेक्षणच्या कामातून वगळण्याची मागणी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मान्य केली असून त्यानुसार सर्व जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकांना निर्देश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती या संघटनेने नुकतेच विविध मागण्यांच्या अनुषंगाने मंत्री ॲड. ठाकूर यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यानुसार ॲड. ठाकूर यांनी निर्देश दिल्याप्रमाणे आज एकात्मिक बाल विकास योजना आयुक्त इंद्रा मालो यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकांना लेखी सूचना दिल्या आहेत.

मार्चपासून कोविड-१९ प्रादुर्भावास सुरुवात झाल्यानंतर राज्यातील नागरी, ग्रामीण आणि आदिवासी भागातील अंगणवाडी सेविकांना कोविड-१९ च्या सर्वेक्षणाचे काम देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी अद्यापपर्यंत ही जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे. तथापि, कोविड सर्वेक्षणाच्या कामामुळे अंगणवाडी सेविकांच्या मूळ कामावर परिणाम होत आहे. शून्य ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे वजन, उंची घेऊन त्यांचे वाढीचे सनियंत्रण (ग्रोथ मॉनिटरिंग) करणे; त्या माध्यमातून कुपोषण लक्षात येत असल्यामुळे वेळीच पोषण आहार आणि इतर उपाययोजनांद्वारे त्यावर मात करणे शक्य होते.

Updated : 20 July 2020 2:23 AM GMT
Next Story
Share it
Top