Home > News > ईशा अंबानी: लग्नाचा खर्च आणि लेहंग्याची भव्यता!

ईशा अंबानी: लग्नाचा खर्च आणि लेहंग्याची भव्यता!

ईशा अंबानी: लग्नाचा खर्च आणि लेहंग्याची भव्यता!
X

मुकेश आणि नीता अंबानी यांची लाडकी मुलगी ईशा अंबानी लक्झरी जीवनशैलीसाठी ओळखली जाते. 12 डिसेंबर 2018 रोजी आनंद पिरामल यांच्याशी झालेल्या लग्नात ती खास सुंदर लेहंग्यात दिसली होती. हा लेहंगा तयार करण्यासाठी खूप मेहनत आणि पैसा खर्च झाला होता.

अबू जानी आणि संदीप खोसला या प्रसिद्ध डिझायनर जोडीने हा लेहंगा तयार केला होता. डीएनएच्या रिपोर्टनुसार या लेहंग्याची किंमत 90 कोटी रुपये इतकी होती. ईशा आणि आनंदच्या लग्नासाठी 700 कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे.
हा खास लेहंगा नीता अंबानी यांच्या लग्नातील दुप्पट्यापासून बनवण्यात आला होता. यावर अतिशय बारकाईने कामगिरी करण्यात आली होती. लग्नाच्या रिसेप्शनमध्ये ईशाने मैसन वॅलेंटिनो यांनी डिझाइन केलेला लेहंगा परिधान केला होता. या लेहंग्यावर सोन्याची काढ होती.

इंडिया टाइम्सच्या रिपोर्टनुसार ईशा अंबानीची एकूण मालमत्ता 831 कोटी रुपये आहे. ईशा आणि आनंदला जुळी मुलं आहेत. मुलीचे नाव आदिया आणि मुलाचे नाव कृष्णा आहे. ईशा अंबानी नेहमीच आपल्या लक्झरी जीवनशैली आणि स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते.

Updated : 17 April 2024 6:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top