Home > News > ईशा अंबानी : पगार, संपत्ती आणि लक्झरी लाईफस्टाईल

ईशा अंबानी : पगार, संपत्ती आणि लक्झरी लाईफस्टाईल

ईशा अंबानी : पगार, संपत्ती आणि लक्झरी लाईफस्टाईल
X

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची लाडकी मुलगी म्हणजेच ईशा अंबानी, ईशा अंबानी (Isha Ambani) आपल्या लक्झरी लाईफस्टाईल आणि बिझनेस कौशल्यांसाठी प्रसिद्ध आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या ईशा अंबानी यांचा मासिक पगार किती आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात असते. तशी तुमच्याही मनात असेल ?

मुकेश अंबानी यांनी त्यांच्या मुलांचा मासिक पगार नेहमीच गुप्त ठेवला आहे. मात्र, काही रिपोर्ट्सनुसार, ईशा अंबानी यांना दर महिन्याला 35 लाख रुपये पगार मिळत असल्याचा अंदाज वर्तवला जातो. तरीही, अंबानी कुटुंबाकडून या माहितीला दुजोरा मिळालेला नाही.

ईशा अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या डिजिटल सेवांच्या विकासात आणि AJIO सारखा यशस्वी ऑनलाइन फॅशन ब्रँड लाँच करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओ यांच्या संचालक मंडळावरही ईशा अंबानी काम करतात.

2018 मध्ये, फोर्ब्सने ईशा अंबानी यांची एकूण संपत्ती 550 कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यांनी मॅकिन्से अँड कंपनीमध्ये काम करून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि 2014 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये सामील झाल्या.

ईशा अंबानी यांचे लग्न पिरामल ग्रुपचे संचालक आनंद पिरामल (Anand Piramal) यांच्याशी झाले आहे. ते मुंबईतील 450 कोटी रुपयांच्या 'गुलिटा' नावाच्या आलिशान बंगल्यात राहतात.

ईशा अंबानी या एक यशस्वी बिझनेसवुमन, लक्झरी लाईफस्टाईलची शौकीन आणि आनंदी व्यक्ती आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये त्यांचं योगदान आणि त्यांची संपत्ती हे त्यांच्या यशाचं प्रतीक आहे.

Updated : 15 March 2024 9:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top