Home > News > 84 टक्के लोकं म्हणतात राज्याची आरोग्य यंत्रणा येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्यास सक्षम..

84 टक्के लोकं म्हणतात राज्याची आरोग्य यंत्रणा येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्यास सक्षम..

84 टक्के लोकं म्हणतात राज्याची आरोग्य यंत्रणा येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्यास सक्षम..
X

राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यातील आरोग्य यंत्रणा तिसऱ्या लाटेला सक्षम आहे का? याबाबत लोकांना काय वाटतं यासाठी मॅक्सवुमनने एक सर्वे केला. त्यानुसार 84 टक्के लोकांना असं वाटतं की, राज्याची आरोग्य यंत्रणा येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्यास सक्षम आहे...

कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हायला सुरूवात झाली असतानाच अचानक दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन या विषाणूचा प्रादुर्भाव समोर आला. त्यानंतर जगभर ओमिक्रॉनच्या रूग्ण आणि त्यांना रूग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ओमिक्रॉन व्हेरियंट कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती- गेल्या काही दिवसांपुर्वी मंदावलेला कोरोनाचा आकडा पुन्हा वाढायला सुरूवात झाली आहे. गेल्या 24 तासात राज्यात 3 हजार 900 कोरोना रूग्णांची वाढ तर 20 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या 0.22 टक्के रुग्ण उपचार घेत आहेत.

यामुळे आता सर्वसामान्यांना एकच प्रश्न आहे तो म्हणजे तिसऱ्या लाटेला राज्याची आरोग्य यंत्रणा सक्षम आहे का? जर ही रुगणसंख्या अशीच वाढत राहिली तर पुन्हा एकदा मागच्या वेळ सारखी परिस्थिती होईल अशी भीती आज सर्वांच्याच मनात आहे. पण मागील दोन वर्ष्याच्या अनुभवानंतर आरोग्य यंत्रणा आता जोरात कमाला लागली आहे. मागच्या वेळी ज्या चूका झाल्या त्या होऊ नये म्हणून आरोग्य यंत्रणेकडून खबरदारी घेतली जात आहे.

राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता. राज्यातील आरोग्य यंत्रणा तिसऱ्या लाटेला सक्षम आहे का? याबाबत लोकांना काय वाटतं यासाठी मॅक्सवुमनच्या माध्यमातून एक सर्वे केला. यामध्ये 173 लोकांनी आपलं मतं नोंदवलं. त्यानुसार 84 टक्के लोकांना असं वाटतं की, राज्याची आरोग्य यंत्रणा येणाऱ्या परिस्थितीला समोर जाण्यास सक्षम आहे. तर केवळ 16 टक्के लोकांना असं वाटतं की आरोग्य यंत्रणा सक्षम नाही. एकंदरीत जर पाहिलं तर लोकांना आता मागील काळात आलेल्या अनुभवातून आरोग्य यंत्रणा आता येणारी परिस्थितीत योग्यरीत्या हाताळू शकेल अस वाटतंय.




Updated : 31 Dec 2021 6:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top