Home > News > आझम कॅम्पसमध्ये 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' उत्साहात साजरा

आझम कॅम्पसमध्ये 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' उत्साहात साजरा

आझम कॅम्पसमध्ये  आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
X

पुणे :

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे दिनांक २१ जून रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या विद्यालयांमधील दोन हजारहून अधिक विद्यार्थी - विद्यार्थिनीनी योग प्रात्यक्षिके सादर केली. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तसेच डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. पी.ए.इनामदार , संस्थेचे सचिव प्रा. इरफान शेख, मुख्याध्यापक,शिक्षक उपस्थित होते.हा प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम फंक्शन ग्राऊंड (आझम कॅम्पस) येथे झाला. 'आझम स्पोर्ट्स अकादमी'चे संचालक डॉ. गुलझार शेख, शबनम पिरजादे,माजिद सय्यद यांनी संयोजन केले.

'शारीरिक, मानसिक स्वास्थ जपण्याची योग परंपरा हजारो वर्षांपासून भारतात आहे. ही परंपरा घराघरात, जगभर पोहोचविण्याचे काम सर्वांनी करावे. सुदृढ , बलशाली भारताचे स्वप्न त्यातून साकार होईल ', असे प्रतिपादन डॉ.पी.ए.इनामदार यांनी यावेळी केले.


Updated : 21 Jun 2024 3:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top